बेळगाव लाईव्ह : राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांनी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, वंदे भारत रेल्वेसेवेचा विस्तार धारवाडहून बेळगावपर्यंत लवकरात लवकर करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच, बेळगाव-मिरज दरम्यान मेमो ट्रेन सुरू करण्यासह मुंबई-होस्पेट (गाडी क्रमांक 111139/40) आणि सोलापूर-होस्पेट (गाडी क्रमांक 11415/16) या गाड्यांचे बेल्लारीपर्यंत विस्तारासाठीही त्यांनी आग्रह धरला.
नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी झालेल्या बैठकीत राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांनी बेळगावसाठी रेल्वेसेवा सुधारण्याच्या दृष्टीने विविध मागण्या मांडल्या. यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसचा बेळगावपर्यंत लवकरात लवकर विस्तार करण्यासह, बेळगाव-मिरज दरम्यान मेमो ट्रेन सुरू करण्याची मागणी केली.
याशिवाय, मुंबई-होस्पेट (111139/40) आणि सोलापूर-होस्पेट (11415/16) या गाड्यांचे बेल्लारी रेल्वे स्थानकापर्यंत विस्तार करण्यासाठी त्यांनी आग्रह धरला.
या बैठकीला केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि नवीन व पुनर्नवीनीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी तसेच बेळगाव लोकसभा खासदार जगदीश शेट्टर हे देखील उपस्थित होते.
खासदार कडाडी यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रस्तावांची तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. बेळगावसाठी रेल्वेसेवेचा दर्जा उंचावण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि जलद प्रवासाचा लाभ मिळणार आहे.