बेळगाव लाईव्ह : बेळगाव मधील नामांकित आणि नंबर वन वेब चॅनेल ‘बेळगाव लाईव्ह’चा ८वा वर्धापनदिन मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मोठ्या दिमाखात पार पडला. हॉटेल विराट येथे आयोजित कार्यक्रमात बेळगावमधील विविध वृत्तवाहिन्या, दैनिके आणि समाजमाध्यमांचा प्रतिनिधी, पत्रकार तसेच छायाचित्रकार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सोहळ्यात विविध मान्यवरांनी ‘बेळगाव लाईव्ह’वर शुभेच्छांचा वर्षाव केला.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील बोलताना म्हणाले, पत्रकारिता हि समाजाची खिडकी आहे. आज कोणतेही क्षेत्र त्सिमीत राहिले नाही. कार्यक्षेत्राच्या कक्षा प्रत्येक क्षेत्रात वाढत चालल्या आहेत. यानुसार पत्रकारिता क्षेत्र देखील वृद्धिंगत होत आहे. एखादा माणूस एका क्षेत्रात येतो त्यावेळी आपल्यासोबत अनेक नव्या संकल्पना घेऊन येतो. आपल्या कल्पनांच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करतो, हाच प्रयत्न ‘बेळगाव लाईव्ह’च्या माध्यमातून सुरु असल्याचे ते म्हणाले.
मराठी भाषा दिन आणि बेळगाव लाईव्ह वर्धानपनदिनाच्या औचित्याने बेळगावचे रीलस्टार्स जगदीश सुतार उर्फ कार्टून जग्ग्या, महेश खटावकर उर्फ गोल्डन अंकल, संकेत येळ्ळूरकर, योगेश भोसले उर्फ कॉमेडी योग्या यांच्यासह इत्तेहाड न्यूजचे इकबाल जकाती यांना उर्दू अकॅडमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तर उपस्थित वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी तसेच जिल्हा मराठी पत्रकार संघ, डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वतीने ‘बेळगाव लाईव्ह’ चे संपादक प्रकाश बेळगोजी यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास पत्रकार प्रसाद प्रभू, हभप शंकर बाबली, विराट हॉटेलचे मालक कपिल भोसले, युवा नेते सागर पाटील, मोटिवेशनल स्पीकर विजय सांबरेकर,पत्रकार डी. के. पाटील , इकबाल जकाती, जितेंद्र शिंदे, गंगाधार पाटील, मिलिंद देसाई, शेखर पाटील, सुहास हुद्दार, महेश काशिद ,रतन गवंडी ,महादेव पवार, विश्वनाथ यळ्ळूरकर, दिपक सुतार ,मल्हारलिंग, एकनाथ अगसीमणी,अनंत कुचेकर,अरुण यळ्ळूरकर, नागराज, अमृत बिर्जे, कॅमेरा मॅन प्रवीण शिंदे ,नागराज, खानापूरचे पत्रकार दिनकर मरगाळे यांच्यासह प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, डिजीटल मीडियाचे अनेक मान्यवर यांच्यासह जयेश भातकांडे, सूर्यकांत हिंडलगेकर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद प्रभू यांनी केले.
मुंबईतील दिग्गज पत्रकारांच्या शुभेच्छा
मराठी भाषा दिनाचे उचित साधून बेळगाव लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त हजारो वाचक आणि प्रेक्षकांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. मुंबईतील अनेक ज्येष्ठ पत्रकार दिग्गज संपादक आणि राजकारण्यांनी बेळगाव बेळगाव लाईव्हला ऑनलाइन शुभेच्छा देत अल्पावधीतच बेळगावचा आवाज बनलेल्या डिजिटल माध्यमाचं कौतुक केलं.