बेळगाव लाईव्ह :अवतारच्या “भारतातील महिलांसाठी सर्वोत्तम शहरे 2024” अहवालाने कर्नाटकला महिलांच्या समावेशकतेत आणि विकासात आघाडीवर ठेवले असून टॉप 10 शहरांमध्ये स्थान मिळवणाऱ्या बेंगलोरसह बेळगाव शहर 27 व्या क्रमांकावर आहे. महिलांसाठी सुरक्षित, समावेशक आणि सक्षमीकरण वातावरण निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांवर आधारित मानांकनांमध्ये (रँकिंग) देशातील शहरांना मान्यता देण्यात आली आहे.
घनकचरा व्यवस्थापन उपक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बेळगावला गेल्या 2024 मध्ये 17.46 गुणांसह सिटी इन्क्लुजन स्कोअरमध्ये 27 व्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. बेळगाव शहराने सुरक्षितता, आरोग्यसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील प्रगतीने शहराच्या एकंदर प्रगती महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
तथापि मागील 2023 च्या 13 व्या स्थानावरील मानांकनाच्या तुलनेत यावेळचे मानांकन घसरण दर्शवते. तेंव्हा बेळगावने गुण 31.32 गुण संपादन केले होते. बेळगावचे 2024 चे मानांकन : शहर समावेशन गुण: 27 स्थान (गुण 17.46) सामाजिक समावेश गुण
(एसआयएस) मानांकन : 20 वे. औद्योगिक समावेशन गुण (आयआयएस) मानांकन : 69 वे. 2024 मधील महिलांची शीर्ष शहरे
बेळगावचे 2023 चे मानांकन : शहर समावेशन मानांकन – 13 वे (गुण : 31.32). सामाजिक समावेशन गुण (एसआयएस) मानांकन : 22 वे. औद्योगिक समावेशन स्कोअर (आयआयएस) मानांकन : 13 वे.
सामाजिक समावेशन मानांकन राहणीमान, सुरक्षितता, कामगार सहभाग आणि महिला सक्षमीकरण उपक्रमांचे मूल्यांकन करते, तर औद्योगिक समावेशन मानांकन लिंग-समावेशक कार्यस्थळे, महिला-अनुकूल उद्योग आणि बालसंगोपन समर्थन आणि लवचिक कार्य धोरणे यासारख्या करिअर सक्षमीकरणांचे मूल्यांकन करते. अधिक समावेशक समाज निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान असूनही बेळगावच्या क्रमवारीतील घसरण
औद्योगिक समावेश आणि लिंग-समान करिअर संधींमध्ये मजबूत धोरणे आणि शाश्वत प्रयत्नांची आवश्यकता दर्शवते. अवतार अहवाल संपूर्ण भारतात महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी धोरणकर्ते, संस्था आणि व्यक्तींसाठी एक रोडमॅप अर्थात दिशादर्शक म्हणून म्हणून काम करतो.

