Sunday, March 23, 2025

/

राज्यव्यापी बंदचा बेळगावमध्ये फज्जा; सर्व व्यवहार सुरळीत

 belgaum

बेळगाव लाईव्ह :केएसआरटीसी बस कंडक्टर आणि ड्रायव्हर्सवर अलिकडेच झालेले हल्ले आणि मराठी समर्थक कार्यकर्त्यांनी केलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ कार्यकर्ते वाटाळ नागराज यांच्या नेतृत्वाखालील कन्नड समर्थक संघटनांनी आज 22 मार्च रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदचा बेळगावमध्ये संपूर्णपणे फज्जा उडाला.

मराठी द्वेष्टे कन्नड नेते वाटाळ नागराज दिलेल्या या बंदच्या हाकेकडे पाठ फिरवत राज्य परिवहन मंडळाच्या बस सेवेसह शहरातील इतर सर्व व्यवहार आज शनिवारी सुरळीत होते.

जुने उणे काढत वाटाळ नागराज यांच्या नेतृत्वाखालील कन्नड संघटनांनी आज कर्नाटक बंदची हाक दिली होती. मात्र शहरातील कन्नड काही कन्नड संघटनेचे कार्यकर्ते वगळता इतर जवळपास सर्व संघटना, सरकारी यंत्रणा आणि सर्वसामान्य नागरिकांनी या बंदकडे पाठ फिरवली होती. शहरातील काही मोजकी दुकाने वगळता सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते.Fajja

बंद काळात खबरदारी म्हणून स्थगित ठेवण्यात येणारी शहर व सेवा देखील आज सुरू राहिल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत होते. आपल्या नेत्यांनी दिलेल्या बंदच्या हाकेला प्रतिसाद देताना शहरातील कांही कन्नड संघटनांच्या मुठभर कार्यकर्त्यांनी मात्र राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे जमून आंदोलन केले.

यावेळी त्यांनी निदर्शने करून शहराचे लक्ष वेधण्याचा केविलवाना प्रयत्न केला. बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान या पद्धतीने परीक्षांचा मोसम, रमजान सण आणि आर्थिक उलाढाली संदर्भात महत्त्वाच्या घडामोडी शहरात घडत असताना बेळगावला वेठीस धरण्याचा अनाठायी प्रकार कानडी संघटनांकडून केला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.