बेळगाव लाईव्ह: सीमा लढ्याचा केंद्रबिंदू असणारे येळळूर गावचे शिष्टमंडळ भेटले असून पुढील महिन्यात 26 एप्रिल रोजी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत.
पुणे येथे बेळगाव येथील येळ्ळूर गावच्या मराठी मॉडेल शाळा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कमिटीने रविवारी सायंकाळी चार वाजता पूणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये भेट घेतली.
आगामी 26 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या मराठी शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव उद्घाटन समारंभाला पवार साहेबांनी उद्घाटक म्हणून येण्याची संमती दर्शवली.
याप्रसंगी अभियंते अमित देसाई शतकोत्तर कमिटीचे अध्यक्ष रावजी पाटील सेक्रेटरी मुख्याध्यापक राजेंद्र कुमार चलवादी स्मरणिका कमिटीचे अध्यक्ष बबन कानशिडे ,निधी संकलन कमिटीचे अध्यक्ष माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील श्रीधर धामणेकर,सुनील हलगेकरसर मुख्याध्यापक आनंद आप्पाजी पाटील अभियंते गीतन ज्योतिबा गेंडे, अभियंते नारायण गोरे श्रीमान किरण पाटील संतोष कदम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
येळळूर येथील मराठी शाळेच्या शतकोत्तर कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पवार हे बेळगावला येणार आहेत. मागील वर्षी बेळगाव येथील एका खाजगी इस्पितळाच्या उद्घाटन कार्यक्रमाला आले होते त्या अगोदर आणि मराठा बँकेचा कार्यक्रमात देखील हजेरी लावली होती.