Wednesday, February 26, 2025

/

मराठा सेंटर येथे 2 एप्रिलपासून डीएससी भरती मेळावा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :डीएससीमध्ये नांव नोंदणीसाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे फक्त मराठा लाईट इन्फंट्रीच्या नियमित सैन्याचे माजी सैनिक/ टीए पर्सनल यांच्यासाठी सोल्जर जनरल ड्युटी आणि सोल्जर क्लर्क (एसडी) पदाकरिता येत्या बुधवार दि. 2 व गुरुवार दि. 3 एप्रिल 2025 रोजी डीएससी भरती मेळावा (रॅली) आयोजित करण्यात आला आहे.

सदर भरती मेळाव्यासाठी नावनोंदणीची तारीख सोल्जर जीडी पदासाठी सैन्याच्या मागील सेवानिवृत्तीच्या तारखेपासून 2 वर्षा आतील असावी. त्याचप्रमाणे सोल्जर क्लार्क पदासाठी 5 वर्षा आतील असली पाहिजे.

नांव नोंदणीच्या तारखेला सोल्जर जीडीसाठी वय 46 वर्षांपेक्षा कमी आणि सोल्जर क्लार्कसाठी 48 वर्षांपेक्षा कमी असावे. मागील सेवेत किमान 5 वर्षे तिरंग्याची सेवा केलेली असावी. तसेच सेवेतून मुक्त होते वेळी चारित्र्याचे मूल्यांकन ‘अनुकरणीय’ किंवा ‘खूप चांगले’ असे असले पाहिजे.

तरी सोल्जर जनरल ड्युटी / क्लार्क (एसडी) म्हणून डीएससीमध्ये नांव नोंदणी करू इच्छिणाऱ्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी बुधवार दि. 2 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7 वाजता मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे आपली हजेरी नोंदवावी, असे आवाहन मेजर /लेफ्ट. कर्नल, एडजूटेंट, एमएलआयआरसी बेळगाव यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.