अशी असणार येळळूर महाराष्ट्र एकीकरण समितीची कार्यकारणी

0
6
Mes yellur
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सीमा लढ्याचा सीमा भागाचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या येळळूर महाराष्ट्र एकीकरण समितीची पुनर्रचना करण्यात आली असून नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून या गावची कार्यकारणी नियुक्त करण्यासाठी अनेक बैठका झाल्या होत्या अखेर त्याला मुहूर्त मिळाला आहे.

बेळगाव सीमा लढ्यात येळळूर गावचे योगदान सर्वश्रुत आहे मागील विधानसभा निवडणुका मधून देखील येळळूर गावाने मराठी बाणा दाखवून दिला आहे त्यामुळे या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

सोमवारी येळ्ळूर रोजी येळ्ळूर विभाग म.ए. समितीची बैठक मावळते अध्यक्ष शांताराम कुगजी यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे कार्यालय बालशिवाजी वाचनालय या ठिकाणी संपन्न झाली. यावेळी समितीचे जेष्ठ नेते,आजी माजी लोकप्रतिनिधी व युवा समितिनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समितीच्या नवीन कार्यकारणीची एकमताने निवड करण्यात आली. नवीन कार्यकारणी मध्ये जास्तीत जास्त युवकांना प्राधान्य देण्यात आले आहे.Mes yellur

 belgaum

नवीन कार्यकारिणी मंडळाची खालीलप्रमाणे नेमणूक करण्यात आली

*अध्यक्ष* : विलास ना. घाडी
*उपाध्यक्ष* : लक्ष्मण मेलगे, मनोहर आ. पाटील,लक्ष्मण छत्रन्नावर, रामदास धुळजी
*कार्याध्यक्ष* : भुजंग पाटील
*सेक्रेटरी* : राजु उघाडे
*उपसेक्रेटरी* : चेतन हुंदरे,प्रशांत भातकांडे
*खजिनदार* : मनोहर सी पाटील
*उपखजिनदार*: सुनील पाटील,मारुती यळगुकर
*हिशोब तपासनीस* :परशराम घाडी,मूर्तीकुमार माने,मनोज बेकवाडकर,रामा पाखरे,सिद्धार्थ पाटील
*संपर्कप्रमुख*: निखिल पाटील,मधु पाटील,रुपेश मेलगे, मनिषा घाडी,शालन पाटील,गणेश अष्टेकर,सतिश धामणेकर,गोटू सांबरेकर,विनोद पाटील,प्रकाश मालुचे,शुभम जाधव,बाळकृष्ण पाटील ,प्रसाद बिर्जे ,आकाश मंगनाईक, अक्षय पाटील
*सल्लागार* : बबन कुगजी,प्रसाद कानशिडे, अश्विन मालुचे,विनोद लोहार,प्रमोद सूर्यवंशी,किरण पाटील,विकास यरमाळकर, गणपत तारीहाळकर,प्रशांत पाटील।

वरील कार्यकारिणीवर नियंत्रण कमिटीची नेमणूक करण्यात आली ती पुढील प्रमाणे अर्जुन गोरल,रावजी म पाटील,शांताराम कुगजी,एम वाय घाडी,दामूना परीट, वामन पाटील, प्रकाश अष्टेकर, उदय जाधव,प्रदीप मुरकुटे,म्हातृ लोहार, तानाजी हलगेकर,शिवाजी पाटील,शिवाजी गोरल,अजित पाटील,दशरथ पाटील,गोपाळ शहापुरकर,नारायण बस्तवाडकर,दौलत पाटील,बाळकृष्ण धामणेकर,एन डी पाटील,आनंद घाडी,यल्लप्पा पाटील,रमेश पाटील,सुभाष धुळजी,तुकाराम टक्केकर,मनोहर सांबरेकर,यल्लप्पा बिर्जे, अशोक हत्तीकर,शंकर टक्केकर

वरील कार्यकारिणीच्या निवडीसाठी समितीचे ज्येष्ठ नेते रावजी पाटील,एम वाय घाडी, दामू अण्णा परीट, वामन पाटील,प्रकाश अष्टेकर, उदय जाधव, म्हात्रु हट्टीकर,एन डी पाटील तसेच माजी ग्राम पंचायत अध्यक्ष व विद्यमान सदस्य सतीश पाटील,ग्राम पंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, ग्राम पंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, रमेश मेणसे, परशराम परीट,जोतिबा चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील यांनी केले. तसेच बाळकृष्ण अनंत पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. आभार प्रकाश अष्टेकर यांनी मानले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.