‘व्यसनी मोठ्या भावाचा लहान भावाने केला खून’

0
2
Police logo
 belgaum

दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या भावावर टॉमीने हल्ला करून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केला आहे.रविवारी रात्री अकराच्या वाजताच्या दरम्यान बेळगाव तालुक्यातील चंदगड(अष्टे) गावात ही घडली आहे.

कृष्णा शिवाजी कालकुंद्री वय 30 रा.चंदगड बेळगाव असे या घटनेत खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी मारिहाळ पोलिसांत मयताच्या आईने फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा याला दारू पिण्याचे व्यसन जडले होते तो दररोज दारू पिऊन घरी येऊन भांडण करत असे रविवारी रात्री देखील तो दारू पिऊन येऊन शिवीगाळ करत होता त्यावेळी राग अनावर झाल्याने कृष्णा याचा लहान भाऊ मारुती शिवाजी कालकुंद्री वय 28 याने टॉमीने हल्ला केला त्यात कृष्णा याचा मृत्यू झाला.

 belgaum

घटनास्थळी मारिहाळ पोलिसांनी पंचनामा केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.