20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: May 31, 2023

बेळगावमध्ये आंतरराष्ट्रीय पत्रकार कार्यशाळेचे आयोजन

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक वर्किंग जर्नालिस्ट असोसिएशनच्या वतीने बेळगावमध्ये के एल इ जिरगे हॉल येथे ९ ते ११ जून या कालावधीत तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे प्रमुख आकर्षण श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या तसेच...

रेशन तांदळामध्ये प्लास्टिक तांदूळ!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील  पश्चिम भागात रेशन तांदळामध्ये प्लास्टिक तांदूळ आढळून आला असून लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. बेकायदेशीर रित्या बीपीएल कार्डचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांविरोधात कडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र अलीकडे रेशन तांदळामध्ये प्लास्टिकचा तांदूळ आढळत...

आम. राजू सेठ यांनी दिली बीम्सला भेट

बेळगाव लाईव्ह : बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी आज जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी सर्वांनी समन्वयाने काम करण्याची सूचना करून सरकारकडून आवश्यक सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले. बेळगाव उत्तर मतदार...

काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रत्येकाची काँग्रेसला बळकटी : उपमुख्यमंत्री

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणूक तिकीट वाटपानंतर नाराज झालेल्या इच्छुकांनी, कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी काँग्रेसमध्ये विविध पक्षातून प्रवेश घेतला. काँग्रेस प्रवेश केलेल्या नेत्यांना उमेदवारी देखील जाहीर झाली. मात्र यापैकी काहींनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला तर काहींनी पराभव. भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले...

अंकली येथून शितोळे सरकारांच्या मानाच्या अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान

अंकली येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा अशा या  मानाच्या अश्वांच्या अंकली ते आळंदी अशा 300 किमी प्रवासास सुरवात करण्यात आली. अंकली येथील शितोळे घराण्याकडे 190 वर्षापासून माऊलीच्या अश्‍वाची परंपरा आहे. या परंपरेनुसार ...

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदलीचा मुहूर्त

बेळगाव लाईव्ह : काँग्रेस सरकारने सत्तेवर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी परवानगी देणारा आदेश जारी केला असून १ ते १५ जूनपर्यंत बदली करण्याची सूचना करण्यात आली आहे. बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी आता बदलीला मुहूर्त मिळाला आहे. प्रामुख्याने शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदलीची जबाबदारी...

बेकायदेशीर शिधापत्रिकाधारकांविरोधात कडक मोहीम!

बेळगाव लाईव्ह : अपात्र असूनही अंत्योदय योजनेअंतर्गत बेकायदेशीर रित्या शिधापत्रिका मिळवून त्यावरील लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांविरोधात राज्यव्यापी मोहीम आखण्यात आली असून आतापर्यंत या मोहिमे अंतर्गत १३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सदर मोहिमेदरम्यान बीपीएल कार्डे आढळून आलेल्यांमध्ये सरकारी कर्मचारी...

सरकार जमा शस्त्रे परत देण्यास सुरुवात

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी परवानाधारकांकडून पोलीस ठाण्यात जमा करून घेण्यात आलेली बंदूका वगैरे परवाना असलेली शस्त्रे आता निवडणूक संपल्याने पुन्हा संबंधितांना परत दिली जात आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातून एकूण 7,720...

पाण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची महाराष्ट्राला विनंती

उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सहकार्य करावे. त्यासाठी वारणा आणि कोयना जलाशयातून कृष्णा नदी पात्रात तर उज्जनी जलाशयातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एका पत्राद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...

कचऱ्यापासून वीज निर्मितीचा पहिला प्रकल्प तयार

बेळगाव महानगरपालिकेकडून एपीएमसी येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा शहरातील पहिला प्रकल्प तयार करण्यात आला असून सध्या वीज व नळ जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या या प्रकल्पाद्वारे 1 किलो वॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. बेळगाव महापालिकेने कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती करणारे तीन प्रकल्प...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !