23 C
Belgaum
Sunday, June 4, 2023
 belgaum

Daily Archives: May 19, 2023

2000 रुपयांच्या नोटा बंद.. बँकेत बदलून मिळतील नोटा

आरबीआयने शुक्रवार, 19 मे रोजी चलनातून रु. 2000 च्या नोटा काढून घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 23 मे 2023 पासून 2000 रुपयांच्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा करू शकतात किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत इतर मूल्यांच्या नोटांमध्ये बदलू शकतात. एकाच...

अपघाती मृताच्या वारसदारांना 61.50 लाख देण्याचा आदेश

वर्षभरापूर्वी बेळगाव -राकसकोप रस्त्यावर मोटर वाहन अपघातात मृत्युमुखी पडलेल्या राकसकोप (ता. जि. बेळगाव) येथील भाऊराव नारायण कंग्राळकर यांच्या वारसदारांना भरपाई दाखल व्याजासहित एकूण 61 लाख 50 हजार रुपये देण्याचा आदेश बेळगाव चतुर्थ जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मोहन प्रभू...

ती बनली यशस्वी…प्रगतशील शेतकरी

मनात प्रचंड जिद्द, आत्मविश्वास असण्याबरोबरच परिश्रम घेण्याची तयारी असेल तर उराशी बाळगलेले स्वप्न साकारता आले नसले तरी त्यापेक्षाही नवे सुंदर स्वप्न साकारता येऊ शकते हे जाफरवाडी येथील 26 वर्षीय निकिता वैजू पाटील या शेतकरी कुटुंबातील युवतीने दाखवून दिले आहे....

काँग्रेस तरी करेल का बळ्ळारी नाल्याची स्वच्छता ?*

बेळगावला स्मार्टसिटी करण्यासाठी वारेमाप पैशाची उधळपट्टी झाली पण ज्या बळ्ळारी नाल्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळ्यात ज्याच्यामुळे शहरातील पाण्याचा निचरा होऊ शकतो, जो परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे त्या बळ्ळारी नाल्याचा विकास दुर्दैवाने मागील भाजपा...

हेस्कॉमकडून बिलासाठी लवकरच पूर्ववत यूपीआय ॲप्स सुविधा

हुबळी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीने (हेस्कॉम) गेल्या 18 मार्च 2023 पासून विजेची सर्व ऑनलाईन बिल फक्त बीबीपीएस (भारत बिल पेमेंट सिस्टीम) ॲपच्या माध्यमातून भरून घेतली जातील असे जाहीर केले. त्यामुळे ग्राहकांना आता फक्त हेस्कॉम वेबसाईटच्या माध्यमातूनच बिले भरावी लागत आहेत....

काळी व्याघ्र संरक्षित प्रदेशात आता प्रवेश शुल्क आकारणी

रामनगर -गोवा मार्गावरील काळी व्याघ्र संरक्षित प्रदेशासह कर्नाटकातील कोणत्याही वन्यजीव अभयारण्यातून प्रवास करणाऱ्या वाहनांना यापुढे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे अनमोड येथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गोव्यातून कर्नाटकात येणाऱ्या वाहनधारकांकडून गेल्या बुधवारपासून प्रवेश शुल्क आकारले जात आहे. राज्यातील व्याघ्र संरक्षित...

युवकाच्या खुनाने हादरले मारिहाळ

अज्ञातांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून एका युवकाचा निर्घृण खून केल्याची घटना काल गुरुवारी रात्री बेळगाव तालुक्यातील मारीहाळ गावात घडली असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. खून झालेल्या युवकाचे नाव महांतेश रुद्रप्पा करलिंगणावर (वय 23, रा मारीहाळ) असे आहे. खुनाचे नेमके...

दाखले आणि माहितीसाठी द्यावा लागणार लेखी अर्ज

बेळगाव लाईव्ह : महानगर पालिकेकडून देण्यात येणाऱ्या जन्म-मृत्यू दाखल्यासाठी, तसेच अन्य माहितीसाठी आता लेखी अर्ज सक्तीचा करण्यात आला असून यापुढे दाखले किंवा अन्य कोणत्याही माहितीसाठी विहित नमुन्यात अर्ज न देता कोऱ्या कागदावर आयुक्त किंवा आरोग्याधिकाऱ्यांच्या नावे अर्ज देण्यात यावा,...
- Advertisement -

Latest News

शासकीय कार्यालयांच्या बहुमजली इमारतीच्या बांधकामासाठी पाहणी

बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !