बेळगाव लाईव्ह : बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात सीमाभागात विविध घडामोडी घडल्या. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील भाजप आणि काँग्रेस पक्षावर निशाणा साधताना सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधार्थ प्रचार करण्यासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांना विरोध करण्याचे आवाहन...
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षांचे विविध नेते प्रचासाठी कर्नाटक दौऱ्यावर येत आहेत. मात्र राष्ट्रीय पक्षांच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या विरोधार्थ प्रचाराचा सपाटा सुरु केला आहे.
याविरोधात आज समिती कार्यकर्ते आक्रमक झाले. आज देवेंद्र...
बेळगाव लाईव्ह : गेल्या ३० वर्षांपासून आपण भाजपमध्ये निष्ठेने कार्य केले. मात्र भाजपाला ज्येष्ठ नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची कदर नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केली. बेळगावमध्ये काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेले जगदीश शेट्टर यांनी भाजपवर टीका करत काँग्रेस...
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान होणार असून १० मे रोजी बेळगावमधील १८ विधानसभा मतदार संघासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतप्रक्रिया पार पडणार आहे.
ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन हे मत नोंदविण्यासाठी वापरले जाणारे...
बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्षांचे नेते आज बेळगावमध्ये आपापल्या पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले असून समिती उमेदवारांच्या विरोधार्थ ते प्रचारात उतरले आहेत. यामुळे संतापलेल्या समिती कार्यकर्त्यांकडून त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील जनतेला जय बजरंग बली असे बोलून मतदान करण्यास सांगितले आहे. मात्र कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र म्हणजे सीमा भागातील मराठी भाषिकांनी 'जय भवानी जय शिवाजी' असे बोलून मतदान करावे, असे आवाहन शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केले...
बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात विधानसभा निवडणुका जाहीर होताच एरव्ही महाराष्ट्रातील नेत्यांवर तोंडसुख घेणाऱ्या कर्नाटकातील नेत्यांकडून महाराष्ट्रातील नेत्यांसाठी पायघड्या घालण्यात येतात. सीमाभागात आपल्या भाषिक हक्कांसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या विरोधार्थ प्रचार करण्यासाठी अलीकडे महाराष्ट्रातील सर्वपासखिया नेते दाखल होतात. मात्र...
महाराष्ट्र एकीकरण समितीने आपला प्रचार जरूर करावा. मात्र राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्हाला आमची भूमिका मांडावी लागणार आहे असे मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आज गुरुवारी बेळगावात दाखल झाल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत...
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने टिळक चौक येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रचार सभेचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता या सभेला सुरुवात होण्यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना काळे निशाण दाखवून...
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करताना महाराष्ट्रातून मराठी माणसाच्या विरोधात प्रचारास येणाऱ्या सर्वच राष्ट्रीय पक्षांचा निषेध करावा अशी मागणी केली आहे. केवळ भाजपच नव्हे तर काँग्रेसच्या नेत्यांना काळी निशाणे दाखवून निषेध नोंदवावा असे ते...