21.1 C
Belgaum
Tuesday, December 5, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 17, 2023

बेळगाव-सिकंदराबाद एक्सप्रेसचा शुभारंभ

बेळगाव : अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून होत असलेल्या मागणीला अनुसरून आजपासून रेल्वे क्रमांक ०७३३५ या बेळगाव-सिकंदराबाद-बेळगाव एक्स्प्रेस रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला. मंगळवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात आला असून पहिल्याच दिवशी रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाले आहे. या रेल्वेमुळे बेळगावहून...

बेनके करंडकासाठी मोरे इलेव्हन, झेन स्पोर्ट्स यांच्यात अंतिम लढत

बलाढ्य मोहन मोरे इलेव्हन आणि झेन स्पोर्ट्स मुंबई या दोन तुल्यबळ संघांमध्ये अनिल बेनके स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित आमदार अनिल बेनके करंडक -2023 अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अजिंक्यपदासाठी उद्या बुधवार दि. 18 जानेवारी रोजी अंतिम लढत होणार...

येळ्ळूर ग्रा. पं. पीडीओ अरुण नाईक यांच्याबाबत नाराजी

बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतीचे पीडीओ अरुण नाईक यांच्याबाबत तक्रारींचा पाऊस सुरु असून ग्राम पंचायत अध्यक्ष-उपाध्यक्षांसह अनेक सदस्यांनी त्यांच्याविरोधात जिल्हापंचायत आणि तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी तसेच ईडीला निवेदन सादर केले आहे. येळ्ळूर ग्राम पंचायत पीडीओ अरुण नाईक यांच्याबाबत निवेदनात अनेक...

पोलिसांवरील हल्ला; ‘त्या’ 33 जणांची निर्दोष मुक्तता

शहरातील जुने गांधीनगर येथे गेल्या जुलै 2015 मध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन उद्भवलेल्या तणाव सदृश्य परिस्थिती प्रसंगी पोलिसांवर हल्ला करून पोलीस वाहन पेटविल्याच्या आरोपातून रमाकांत कोंडुसकर यांच्यासह 33 जणांची बेळगावच्या नवव्या जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. रमाकांत...

रवी कोकितकर हल्ला प्रकरणी नवे वळण!

बेळगाव लाईव्ह : हिंदुत्ववादी संघटनेचे नेते आणि श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. ज्या दिवशी रवी कोकितकर यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी एकच राउंड फायर झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. मात्र, ज्या वाहनातून...

मंत्री मंडळ विस्ताराबाबत ठोस निर्णय होणार?

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. सरकारकडे केवळ चार महिन्यांचा कार्यकाळ बाकी आहे. मात्र अल्पकाळासाठीही अनेक आमदार मंत्रिपदाची आस ठेवून आहेत. मकर संक्रांतीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ठोस निर्णय घेण्यात...

हलगा ग्रामपंचायतीने केले माकडांना जेरबंद

बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून हलगा या गावात माकडांनी धुमाकूळ घातला असून यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. माकडांच्या मर्कटलीलांनी गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. माकडांच्या मर्कटलीलांना वैतागलेल्या ग्रामस्थांनी माकडांना जेरबंद करण्यासाठी मागणी केली होती. या मागणीनुसार ग्रामपंचायतीने माकड पकडण्याची मोहीम...

केवळ आणि केवळ समिती!

बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून मतदारांना विविध भेटवस्तू देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पक्षांकडून होत आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीलाच विजयी करण्यासाठी मराठी भाषिक एकवटला आहे. आज...

हुतात्मा दिन गांभीर्याने, वाहण्यात आली श्रद्धांजली

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये 1956 साली पोलिसांच्या गोळीबारात हौतात्म्य पत्करलेल्या महादेव बारगडी, मारुती बेन्नाळकर, मधु बांदेकर, कमळाबाई मोहिते आदी हुतात्म्यांना सीमावासीय मराठी बांधवांतर्फे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी 17 जानेवारी रोजी शहरातील हुतात्मा चौक येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात...

खनिज उत्खनन प्रकरणी 8 जणांना अटकपूर्व जामीन मंजूर

बेकायदेशीररित्या खोदाई करून खनिज काढून त्याची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 8 जणांचा अटकपूर्व जामीन चौथ्या अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. रामचंद्र पाटील (वय 61), विजय पाटील (वय 50), कलाप्पा पाटील (वय 36), पार्वती पाटील (वय 74), भरमाना...
- Advertisement -

Latest News

समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!

बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !