belgaum

बिबट्याची आता राजकारणातही एंट्री!

0
30
Mems
 belgaum

बेळगावमध्ये सध्या चर्चेचा विषय बनलेल्या आणि प्रशासनाची झोप उडवलेल्या बिबट्याला शोधण्यासाठी पोलीस आणि वनखाते पूर्ण क्षमतेने प्रयत्न करत आहे. शोध मोहिमेचा २३ वा दिवस असूनही अद्याप या प्रयत्नांना यश आले नाही. वन खात्याने मनुष्यबळ वाढवून देखील चलाख बिबट्या अद्याप हाती लागलेला नाही.

बिबट्याचा धोका लक्षात घेऊन गोल्फ कोर्स मैदानाच्या 1 कि. मी. परिघातील 21 शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दुसरीकडे वनखात्याला सतत धूळ चारणारा बिबट्या सोशल मीडियावरील सर्वाधिक वायरल पोस्टचा मानकरी ठरला आहे. प्रशासनाच्या नाकीनऊ आणणाऱ्या आणि सोशल मीडियावर लोकप्रिय झालेल्या या बिबट्याने आता राजकारणातही एन्ट्री घेतली आहे!

बिबट्याला शोधण्यात येत असलेले अपयश हाच मुद्दा हाताशी धरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी सत्ताधारी भाजप नेत्यांवर हल्लाबोल चढविला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांना शह देण्याची तयारी भाजप नेत्यांनी सुरू केली आहे.

यमकनमर्डी मतदारसंघासाठी तुल्यबळ उमेदवार उतरवून त्यांना तेथेच गुंतवून ठेवण्याचा भाजप नेत्यांचा डाव असल्याचे बोलले जात आहे. मात्र हीच बाब घेरून आमदार सतीश जारकीहोळी यांच्या समर्थकांनी ‘बिबट्याला पकडता येत नाही तर सिंहली कसे पकडणार’? अशा शब्दात पोस्ट शेअर केली आहे. हि शेअर आता हळूहळू वायरल होत असून बिबट्यामुळे राजकीय वातावरण देखील गरम होत चालल्याचे निदर्शनात येत आहे.

एकूणच  बेळगाव शहर परिसरात बिबट्यामय वातावरण झाले आहे सगळीकडे कडे कट्ट्यावर बिबट्याचा वावर त्याला जेरबंद कधी केले जाणार आणि वन खात्याची मोहीम याबाबत चर्चा होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.