कोविडचा प्रसार, उत्तर किंवा दक्षिण कर्नाटक अशी काही कारण न देता बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन झालेच पाहिजे, असा आग्रह आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे.
बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर आज चर्चा करण्यात आली. या पत्रकार परिषदेत...
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका–यल्लम्मा देवस्थानच्या हुंडीत एका ऑक्टोबर
महिन्यात सुमारे १ कोटी २० लाख रुपये किंमतीचे सोन्या–चांदीचे दागिने, साहित्य व रोख रक्कम जमा झाली आहे.भाविकांनी आपल्या पूज्य देवीला इतकी मोठी रक्कम दान दिली आहे.
कोरोना लॉकडाउननंतर प्रथमच सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानच्या हुंडीत भक्तांनी जमा केलेला हा यैवज विक्रमी दान ठरले आहे.
महामारी...
घाबरू नका, तुम्हाला फसवणार नाही असे सांगत अरभावीचे आमदार व केएमएफचे अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी यांनी विधानपरिषद निवडणुकीतील भाजपचे उमेदवार
महांतेश कवटगीमठ यांना अभय दिले.
अरभावीत कवटगीमठ यांच्या प्रचारसभेत बोलताना भालचंद्र म्हणाले, रमेश जारकीहोळी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मला मंत्रिपद मिळावे यासाठी १५ आमदारांनी मोहीम चालवली....
कर्नाटक हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा याचं आयोजन करणार आहे ज्या ज्या वेळी बेळगाव वर हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकारने बेळगावात हिवाळी अधिवेशन भरवले त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीने मेळाव्याचे आयोजन करून हिवाळी अधिवेशनात तोडीस तोड उत्तर देत मेळाव्यास...
बेंगळुरूमध्ये कोविड-19 च्या ओमिक्रॉन प्रकाराची देशातील पहिली दोन प्रकरणे आढळून आल्यानंतर कर्नाटक सरकारने सांगितले की, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे असल्यास त्यांच्या पालकांनी कोविड लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे.या आजाराविरूद्ध पूर्णपणे लसीकरण केले असेल तरच त्यांच्या...
कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असताना, विशेषत: बेंगळुरूमध्ये ओमिक्रॉनची दोन प्रकरणे आढळून आल्यानंतर, राज्य सरकारने शुक्रवारी स्पष्ट केले की राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे नियोजित वेळेनुसार होणार आहे.
13 ते 24 डिसेंबर या नियोजनानुसार हे अधिवेशन...
बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत चालला आहे. भटकी कुत्री हल्ला करू लागली आहेत. हिंस्त्र बनत आहेत. त्यामुळे आता नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. बेळगाव शहरात या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा लहान मुले जखमी झाली असून शुक्रवारी दुपारी या...
जारकीहोळी बंधू वेगवेगळ्या पक्षात असले तरी अडचणीच्या वेळी ते एकमेकांच्या मदतीला धावून येतात. हे सगळ्यांनाच माहीत आहे. पक्षांची धोरणे वेगवेगळी असली तरी सगळे भाऊ आतून एक आहेत असे वारंवार बोलले जाते. अनेक वेळा राजकीय समीकरणात हे दिसून आले आहे.
सध्या...
हलगा मच्छे बायपास रस्त्याच्या प्रकरणातील सुनावणी आता सोमवारी होणार आहे .काल शुक्रवारी ही सुनावणी होणार होती. मात्र काही कारणाने न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली असून सोमवार कडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
तोवर कामकाजावर स्थगिती कायम आहे. हा बायपास सुपीक जमिनीतून...