24.9 C
Belgaum
Saturday, June 3, 2023
 belgaum

Daily Archives: Oct 10, 2021

या विभागांत नोकरी संधी

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 3261 जागांसाठी मेगाभरती स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ बीज विश्लेषक, मुली कॅडेट प्रशिक्षक, चार्जमन, कर्मचारी कार चालक, इत्यादी पदांच्या एकूण 3261 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे....

बेळगावातील ‘हा’ देखावा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू

बेळगाव शहरातील मराठा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या जत्तीमठामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीची श्री दुर्गामाता मूर्ती साकारून लक्षवेधी आरास व देखावा सादर केला जातो. यंदादेखील या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण असा झोपाळ्यावर विराजमान झालेल्या श्री दुर्गामाता देवीचा हलता देखावा सादर करण्यात आला...

विद्यार्थ्यांना आता लवकरच मिळणार गणवेश

सरकारने अनुदान उपलब्ध करून दिल्यामुळे आता सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना लवकरच दोन जोड गणवेश उपलब्ध करून दिले जाणार आहेत. दसरा सुट्टीनंतर काही दिवसातच विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले नव्हते. तसेच...

बेनके यांनी पर्यटन मंत्र्यांकडे केली ‘ही” मागणी

भारतीय पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास केला जावा, अशी मागणी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केंद्रीय पर्यटन, बंदर, जहाज आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केली आहे. केंद्रीय पर्यटन, बंदर,...

सहा दिवसात दगावल्या तब्बल 20 गाई

खानापूर तालुक्यातील नंदगडपासून 2 कि. मी. अंतरावर असलेल्या गवळीवाडा येथील तब्बल 20 पाळीव गाई गेल्या सहा दिवसात अचानक दगावल्या आहेत. यामुळे संबंधित जनावर मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. गवळीवाड्यातील जनावर मालकांनी नंदगड येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना गाईंच्या मृत्यूची...

यंदाचा गळीत हंगाम 1 नोव्हें.पासून होणार प्रारंभ

उत्तर कर्नाटकातील उसाचा गळीत हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय दक्षिण भारत साखर कारखान्यांच्या फोरमने एकमताने घेतला आहे. राज्यातील बहुतांश साखर कारखाने हे उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये असून जे दर मोसमामध्ये मोठ्या प्रमाणात साखर उत्पादन करतात. बेळगावमध्ये दक्षिण भारत साखर...

न्यायमूर्ती रितुराज अवस्थी कर्नाटक उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाचे वरिष्ठ न्यायाधीश रीतुराज अवस्थी आता कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील. न्यायमूर्ती अवस्थी यांनी लखनऊ विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर वकिल म्हणून स्वतःची नोंदणी केली. त्यांनी लखनौ खंडपीठ, अलाहाबाद उच्च न्यायालयात नागरी, सेवा, शैक्षणिक बाबींमध्ये सराव केला. त्यांनी 13...

कर्नाटकात भूकंपाचे धक्के

कर्नाटकात रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या संदर्भातील तपशील राष्ट्रीय भूकंपमापन केंद्राने प्रसिद्ध केला असून या संदर्भातील एक ट्विट केले आहे. कर्नाटकातील गुलबर्गा येथे हे धक्के बसले असून त्या संदर्भातील तपशील प्रसिद्ध करण्यात...

ऑनलाईन जुगार बंदी लागू ड्रीम इलेव्हन अॅप कायद्याच्या कचाट्यात

टायगर ग्लोबल समर्थित भारतातील सर्वात लोकप्रिय गेमिंग अॅप्सपैकी एक ड्रीम 11, ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालणाऱ्या नवीन कायद्याच्या कथित उल्लंघनासाठी कर्नाटकमध्ये पोलिस खटल्याचा सामना करत आहे.या आठवड्यात अंमलात आलेला राज्य कायदा, सट्टेबाजी आणि "कोणतीही कृती किंवा पैशाची जोखीम, किंवा अन्य...

बेळगावचा पृथ्वीराज ठरला सुपर डान्सरचा उपविजेता

बेळगावच्या पृथ्वीराज कोंगारी या 11 वर्षाच्या डान्सरने सोनी टीव्हीच्या सुपर डान्सर नृत्य स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवताना मंचावर खऱ्या अर्थाने राज्य केले. प्रतिकूल परिस्थितीत केवळ जिद्द आणि अथक परिश्रमाच्या जोरावर त्याने मिळवलेले हे यश कौतुकास्पद असून पृथ्वीच्या नृत्य प्रवासाची परीक्षक शिल्पा शेट्टी,...
- Advertisement -

Latest News

शासकीय कार्यालयांच्या बहुमजली इमारतीच्या बांधकामासाठी पाहणी

बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !