उत्तर विभागाचे आयजीपी राघवेंद्र सुहास यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नूतन पोलीस महासंचालक म्हणून यांना सतीशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राघवेंद्र सुहास यांची बेंगलोर येथे अंतर्गत सुरक्षा विभागाचे आयजीपी म्हणून बदली झाली आहे.
त्यांच्या जागी सध्या कलबुर्गी विभागाची धुरा सांभाळणारे एन. सतीशकुमार हे आता बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी म्हणून काम पाहणार आहेत.
आयजीपी राघवेंद्र सुहास यांच्याप्रमाणे बेंगलोरचे आयजीपी (प्रशासकीय) के. व्ही. शरथचंद्र, बेळ्ळारी रेंजचे आयजीपी नंजुंडस्वामी, कलबुर्गी नैऋत्य रेंजचे आयजीपी मनीष खरबीकर आणि कलबुर्गी शहराचे आयजी व कमिशनर एन. सतीशकुमार यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आले आहेत.