Wednesday, November 20, 2024

/

घटले कोरोना चाचण्यांचे प्रमाण : पॉझिटिव्हिटी झाली 31 टक्के

 belgaum

मेडिकल बुलेटिनने काल 9 मे रोजी नव्याने आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 613 इतकी घटल्याचे म्हंटले होते. जी स्वागतार्ह बाब असली तरी दुसरीकडे कोरोना चाचण्यांचे प्रमाण 2 हजार पेक्षा कमी झाले आहे, याकडेही गांभीर्याने पाहिले पाहिजे.

उदाहरणार्थ काल रविवारी 9 मे रोजी फक्त 1936 चांचण्या झाल्या. यापैकी 613 चांचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला. एकंदर गेल्या 1 मेपासूनच्या कोरोना चाचण्यांचे प्रमाण पाहता ते घटल्याचे दिसून येते. कारण आता फक्त स्वतःहून कोरोना चांचणीसाठी पुढाकार घेणाऱ्यांची आणि रुग्णांच्या प्राथमिक संपर्कातील (प्रायमरी कॉन्टॅक्ट) व्यक्तींचीच कोरोना चांचणी केली जात आहे.

गेल्या 27 एप्रिल रोजी सुमारे 14,000 कोरोना चांचण्या झाल्या होत्या. त्यानंतर ही संख्या 3,500 च्या आसपास फिरत होती आणि आता ती आणखी घसरत चालली आहे. जिल्ह्यात गेल्या 1 मेपासून काल रविवारी 9 मेपर्यंत दररोज झालेल्या कोरोना चांचण्यांची आकडेवारी, पॉझिटिव्ह रुग्ण आणि पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी अनुक्रमे खालील प्रमाणे आहे.

दि. 1 मे : 3022 चांचण्या, 532 पॉझिटिव्ह रुग्ण, 17.60 टक्के पॉझिटिव्हिटी. दि. 2 मे : 2317 चांचण्या, 372 पॉझिटिव्ह रुग्ण, 16.06 टक्के पॉझिटिव्हिटी. दि. 3 मे : 3108 चांचण्या, 559 पॉझिटिव्ह रुग्ण, 17.99 टक्के पॉझिटिव्हिटी. दि. 4 मे : 4453 चांचण्या, 615 पॉझिटिव्ह रुग्ण, 13.81 टक्के पॉझिटिव्हिटी.

दि. 5 मे : 3564 चांचण्या, 920 पॉझिटिव्ह रुग्ण, 25.81 टक्के पॉझिटिव्हिटी. दि. 6 मे : 3000 चांचण्या, 843 पॉझिटिव्ह रुग्ण, 28.10 टक्के पॉझिटिव्हिटी. दि. 7 मे : 3574 चांचण्या, 965 पॉझिटिव्ह रुग्ण, 27.00 टक्के पॉझिटिव्हिटी. दि. 8 मे : 1662 चांचण्या, 991 पॉझिटिव्ह रुग्ण, 59.63 टक्के पॉझिटिव्हिटी. दि. 9 मे : 1936 चांचण्या, 613 पॉझिटिव्ह रुग्ण, 31.66 टक्के पॉझिटिव्हिटी.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.