Friday, January 31, 2025

/

बेळगावकरांनी किमान आजतरी गर्दी करू नये

 belgaum

उद्यापासूनसंपूर्ण कडक लॉकडाउनलासुरुवात होणार आहे. हे लॉक डाऊन होण्यापूर्वी वेगवेगळ्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची होणारी प्रचंड गर्दी म्हणजे कोरोनाला एका प्रकारे निमंत्रण देण्यासारखेच आहे.

काल अर्थात शनिवारीही बेळगावात अनेक ठिकाणी गर्दीचे आकडे फुगले.किमान आजतरी ही गर्दी होऊ नये हीच अपेक्षा आहे.
कालकोविडनियमावलीकडेडोळेझाक करत आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी ठिकठिकाणच्या बाजारपेठांत तुडुंब गर्दी केली होती.

बेळगावची प्रमुख बाजारपेठ असलेल्या रविवारपेठ, गणपत गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली आदी भागात भाजीपाला, फळे-फुले व अन्य साहित्य खरेदीसाठी शनिवारीही जणू जनसागरच लोटला. लोकांनी सामाजिक अंतर राखण्याचेही भान ठेवले नसल्याचे दिसून आले. घोळक्याने साहित्य खरेदी करत नागरिकांनी कोविड मार्गसूची मात्र पायदळी तुडवली.
सध्या सुरु असलेल्या जनता कर्फ्यू काळात सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत लोकांना आवश्यक साहित्य खरेदीसाठी घराबाहेर पडण्याची मूभा सरकारने दिली आहे. परंतु लोक मात्र आपल्याला हवे ते बाजारात मिळेल का नाही अशा विचाराने बाजारात मोठी गर्दी करत आहेत. गंभीर बाब म्हणजे काही नागरिक आपल्या मुलांनाही बाजारपेठेत सोबत आणत आहेत. सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरु असून, तिसरी लाट याहून भयानक असेल आणि तिचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसेल असा इशारा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. मात्र तो अनेक बेळगावकर पालक गांभीर्याने घेत नाही आहेत. त्यांचे बेजबाबदार वर्तन सुरूच आहे.

 belgaum

केवळ बेळगावच्या मुख्य बाजारपेठेतच नव्हे तर उपनगरी बाजारपेठांतही हेच चित्र दिसून येत आहे, जे धोकादायक आहे.
शनिवारी दुपारी १२ वाजल्यापाठोपाठ व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करत ग्राहकांना घरी जाण्यास सांगितले. त्यामुळे गर्दी पांगली. मात्र खरेदीस सूट दिलेल्या वेळेत त्यांनी केलेली गर्दी निश्चितच कोरोनाला निमंत्रण देणारी ठरत आहे.
कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे
जनता कर्फ्यू लावण्यात आलाय. परंतु बेळगावकर मात्र बाजारपेठेत अन रस्त्यावर गर्दी करणे काही केल्या बंद करेनासे झाले आहेत. शनिवारी बेळगावात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे पाहून डीसीपी डॉ. विक्रम आमटेही आश्चर्यचकित झाले. चन्नम्मा चौकात झालेल्या ट्रॅफिक जॅमवर,
त्यांची वाहने जप्त करण्याची मात्रा
मात्र बरोबर लागू पडली.

कोरोनाच्या दुसऱ्या भयंकर लाटेने मोठा उत्पात घडवण्यास प्रारंभ केला आहे. गरीब असो व श्रीमंत, साक्षर असो व निरक्षर, खबरदारी न घेणाऱ्या कोणाचीही पर्वा कोरोना करत नाही हे माहित असूनही बेळगावात लोक मात्र बेजबाबदारीने वागत असल्याचे पोलीस आणि प्रशासनाचे म्हणणे आहे. राज्यात दररोज ५० हजाराच्या प्रमाणात कोरोनाबाधितांची आकडेवारी समोर येत आहे. बेळगाव शहर आणि जिल्ह्यालाही कोरोनाचा घातक विळखा बसलाय. शुक्रवारी एकाच दिवसात जिल्हयात ९६५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाचा फास असा करकचून आवळत चालला असताना बेळगावकर मात्र सावध व्हायला तयार नाहीत.
शनिवारीही बेळगावातील रस्ते गर्दीने भरून गेले होते. सकाळी चन्नम्मा चौकाजवळ मोठा ट्रॅफिक जॅम झाला. तो पाहून डीसीपी डॉ. विक्रम आमटेही आश्चर्यचकित झाले. गाड्यांचा धुरळा उडवत मुक्त संचार करणाऱ्यांची त्यांनी फिल्डवर उतरून चौकशी करण्यास प्रारंभ केला. एवढेच नव्हे तर काही वाहनेही त्यांनी जप्त केली.

विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त करून डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांनी वाहनचालकांना कडक इशारा दिला. पोलिसांनी कितीही आवाहन करूनही, दंड आकारून, वाहने जप्त करूनही नागरिक मात्र अजूनही सावध होत नाही आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि सरकारची ही मोठी डोकेदुखी झाली आहे.आज रविवार आहे त्यामुळे नागरिक मोठ्याप्रमाणात बाहेर पडतील अशी शक्यता असून सामाजिक भान बाळगण्याची गरज आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.