Thursday, December 19, 2024

/

घरासमोर मृतदेह ठेवून आंदोलन

 belgaum

घर विक्री प्रकरणी अन्याय झाल्याने ताण तणाव ग्रस्थ वृद्धाचा आज मृत्यू झाला, यावेळी त्या वृध्दाच्या नातेवाईकांनी फसवलेल्या महिलेच्या घरासमोर मृतदेह ठेऊन निदर्शने केली आहेत.

अशोकनगर बेळगाव येथील रहिवासी 73 वर्षीय शहानवाझ यांचा आज मृत्यू झाला, त्यांचाच मृतदेह घेऊन त्यांच्या नातेवाईकांना आज निदर्शने करावी लागली आहेत. याचे कारण असे समजले आहे की, मयत शहानवाझ यांनीआपली पत्नी मुमताज यांच्या नावे असलेले 32 लाख रुपयाचे घर जमीला दोडमनी यांना विकले होते .

Death body protest masala

मात्र जमीला यांनी पूर्ण रक्कम न देता फक्त 12 लाख भरले होते, यामुळे हा वाद सुरू होता, शहानवाझ यांनी घर परत घ्यावे अशी मागणी जमीला यांनी केली व आम्हाला घर नको पूर्ण पैसे पाहिजे आहेत अशी मागणी शहानवाझ यांनी केली असतानाही जमीला यांनी शहानवाझ यांचा व्यवहार पूर्ण करण्याचे सोडून सत्तर शेख यांना ते घर विकून टाकले होते.
यामुळे जमीला यांच्या घरासमोर मृतदेह ठेऊन निदर्शने करण्यात आली, हे प्रकरण हमरीतुमरीवर आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.