Saturday, April 20, 2024

/

महामेळाव्यास येणारच-धनंजय मुंढे

 belgaum

कर्नाटकी अधिवेशना विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी बेळगावला येणारच असे ठाम आश्वासन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी दिले आहे.

Mundhe dhananjy

शुक्रवारी सायंकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मुंढे यांची भेट घेऊन मागणी केल्यावर ते बोलत होते. माजी महापौर सरिता पाटील आणि जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील,आर आय पाटील यल्लप्पा पाटील चेतक कांबळे यांनी मुंढे यांची भेट घेतली.

मागील वेळी महा मेळाव्यास काळ्या दिनी मी बेळगावला येऊ शकलो नाही मात्र यावेळी मी जरूर येईन असे ते म्हणाले.समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण, गृह राज्य मंत्री दिपक केसरकर आदींची भेट घेऊन चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.