बुधवारी पहाटे जाधव नगर येथे सात आणि कॅम्प कार्यक्षेत्रात तीन अश्या रोडवर पार्किंग केलेल्या महागड्या कार गाडयांना जाळणाऱ्या व्यक्तीला बेळगाव पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. अमित विजयकुमार गायकवाड (वय ३७) मूळ निवासी प्रगतीनगर, गुलबर्गा सध्या राहणार सदाशिवनगर बेळगाव असं याचं नाव असून तो बीम्स मध्ये डॉक्टर कर्मचारी आहे.
*असा लागला शोध*
जाधव नगर येथे सात आणि कॅम्प भागात ३ गाड्या जाळल्या नंतर बुधवारी रात्री कॅम्पमध्ये अकरावी गाडी जाळण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले आहे. जाधव नगर आणि कॅम्प भागातील घरासमोर लावलेल्या गाड्या जाळताना तो अनके सी सी टी व्ही कॅमेर्यात कैद झाला असून त्याच्या मोबाईल लोकेशन वरून देखील ट्रेस झाला अन पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. मानसिक विकृत बुद्धीने तो गाड्या जाळत होता . सदाशिव नगर मध्ये गेली पाच वर्ष भाड्याने राहात असून त्याच्या घरातून पोलिसांनी एक कार, एक दुचाकी , मोबाईल फोन आणि डिझेल साठवण्यासाठी घरी ठेवलेला मोठा ड्रम,लहान लहान बाटल्या, आग लावण्याचे उपकरणं जप्त केली आहेत. गाड्या जाळल्या नंतर स्थानी लोकांनी पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार त्याला पकडण्यात आले आहे.
*केवळ महागड्या गाड्याच टार्गेट*
उच्चशिक्षित डॉक्टरने बेळगावातील ११ गाड्यासह या अगोदर गुलबर्गा येथे देखील १२ गाड्या जाळल्याची कबुली पोलीस तपासात दिली आहे . घरासमोर लावलेल्या बी एम डब्लू ,आय २०, होंडा सिटी अश्याच गाडयांना टार्गेट करत होता .मारुती ८०० स्विफ्ट अशा गाड्याकडे दुर्लक्ष करत असे अशी देखील पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.मानसिक विकृत मुळे तो कार जाळत होता या केस मध्ये जातीय अँगल कडे पाहण्या आधी ही केस उघडकीस आली आहे याच श्रेय माहिती देणाऱ्या जनतेला देखील द्यावे लागेल अस पोलीस उपायुक्त सीमा लाटकर म्हणाल्या. पत्रकार परिषदेवेळी पोलीस उपायुक्त महानिंग नंदगावी, ए सी पी शंकर मारिहाळ ,पोलीस निरीक्षक जे एम कालीमिरची, आदी उपस्थित होते.