Tuesday, April 23, 2024

/

कर्तृत्ववान महिला -अंजली काळे

 belgaum

सर्व प्रकारचे अडथळे दूर करत बेळगाव मध्ये अनेक महिला यशस्वी वाटचाल करीत आहेत. स्वतः निवडलेल्या क्षेत्रात त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे. सामाजिक, क्रीडा आणि इतर कुठलेही क्षेत्र असो, त्यांनी आम्ही पुरुषांपेक्षा कमी नाही हेच दाखवून दिले आहे. यापैकी काही कर्तृत्ववान महिलांची बेळगाव live ओळख करून देत आहे.

माहेर पुणे शिक्षण बारावीपर्यंत संजय काळे त्यांच्याबरोबर विवाह झाल्यानंतर त्या बेळगाव आल्या. काळे कुटुंबीयांचे छोटेसे दुकान होते. घरच्या मंडळींचा हातभार लागावा यासाठी त्यांनी ब्युटी पार्लर सुरू केले. या कामांमध्ये त्यांना आपल्या पतीचे सहकार्य मिळाले.स्वावलंबनाचा ध्येय बाळगून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपला व्यवसाय सुरू केला.

प्रतिकूल परिस्थितीतही खंबीरपणाने जीवनातील प्रत्येक सुख दुखाना सामोरे जात त्यांनी आपला व्यवसाय अखंडितपणे चालवण्याचा प्रयत्न केला.ब्युटीपार्लरच्या व्यवसायातून त्यांनी अनेक मुलींना रोजगाराच्या संधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला.अंजली या ब्युटी पार्लरचा प्रशिक्षण देण्याचेही काम करत असतात.

 belgaum

Anjali kale

अलीकडेच त्यांनी हरी मंदिर समोरील अनगोळ रोड मार्गावर बेळगावातील पहिलेच अत्याधुनिक पद्धतीचे स्पा सुरू केले आहे. त्यांनी सुरू केलेल्या नव्या व्यवसायाची प्रसिद्धीमाध्यमांमध्ये मोठी चर्चा झाली.भावी काळात ब्युटी पार्लर क्षेत्रात इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींना स्वावलंबनाचे धडे देण्याचा त्यांचा मानस आहे.महिला दिनी त्यांचा सामाजिक संस्थेकडून गौरव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.