Friday, April 19, 2024

/

मृणाल कुलकर्णी 10 रोजी बेळगावात

 belgaum

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या एका खाजगी कार्यक्रमासाठी रविवार दि 10 रोजी बेळगावात येणार आहेत. त्या बेळगावात येणार असल्याने त्यांना पाहण्यासाठी अनेकजण गर्दी करणार आहेत. त्यामुळे सध्या एकच चर्चा केली जात आहे.

मारुती गल्ली येथील डॉ कोडकणी आय सेंटर ने नवीन शाखा अयोध्या नगर सिव्हिल हॉस्पिटल रॉड येथे नवीन इमारतीत उघडली आहे. या इमारतीचे उदघाटन करण्यासाठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याच बरोबर जेष्ठ नेत्र तज्ञ डॉ एम एम जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.

या नवीन इमारती मध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. या नवीन इमारती बद्दल माहिती देण्यासाठी हॉस्पिटलवच्या प्रमुख संचालक डॉ शिल्पा कोडकणी यांनी पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली आहे. 2000 साली मारुती गल्ली येथे कोडकणी आय सेंटर सुरू केले आहे. आता याचे स्थलांतर करण्यात आले असून आता नवीन इमारतीत रुग्णांना उपचार देण्यात येणार आहेत.

 belgaum

मृणाल कुलकर्णी या अभिनेत्री असून त्या रुग्णांच्या मदतीसाठी ही अग्रेसर असतात. त्यांच्या रुग्णा बरोबरचे सलोख्याचे नाते असल्यामुळेच त्याना आपण आमंत्रीत केले असल्याचे शिल्पा कोडकणी यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.