Saturday, April 20, 2024

/

रोटरीच्या अन्नोत्सवाचे उदघाटन

 belgaum

रोटरी क्लब ऑफ बेळगाव तर्फे आयोजित अन्नोत्सव शुक्रवार पासून सुरू झाला असून पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी अन्नोत्सवाचे रिबन कट करून शानदार उदघाटन केले. येथील सीपीएड मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील 14 जानेवारी पर्यंत चौदा दिवस सी पी एड मैदानावर हा सोहळा रंगणार आहे. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ मुकुंद उडचनकर,सचिव प्रदीप कुलकर्णी आणि इव्हेंट अध्यक्ष संदीप नाईक उपस्थित होते.

प्रत्येक समाजात खाण्याची वेगवेगळी आवड जपली जाते मराठी जैन, मुस्लिम ,गुजराती, मारवाडी ,बोहरी अशा अनेक समाजाचे लोक बेळगावात राहतात. प्रत्येकाच्या चालीरीती आणि खाण्याच्या सवयी वेगवेगळ्या आहेत. सर्व समाजाच्या लोकांना एकाच ठिकाणी आणून त्यांच्या आवडीनुसार खाण्याचे पदार्थ देणे हा उद्देश ठेवून १९९७ मध्ये रोटरी क्लबने हा कार्यक्रम सुरू केला आहे .अविनाश पोतदार यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आणि तो सर्वानाच आवडता बनला आहे. यावर्षी 180 हुन अधिक स्टॉल घालण्यात आले आहेत

Rotary annotsav

पहिल्या दिवशी स्थानिक नृत्य कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नृत्य संगीत गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.स्टनर डान्स ग्रुप,बिट ब्रेकर्स आणि दहा गायकांनी यात सहभाग नोंदवला होता आगामी दिवसात वेगवेगळे सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रम या अन्नोत्सवात आयोजित केले असून गोवा कोल्हापूर आणि बेळगावातील कलाकार यात सहभागी होणार आहेत.एकूणच सी पी एड मैदान दहा दिवसांत खाद्य पदार्थांची रेलचेल मनोरंजन कार्यक्रमानी गजबजणार आहे.

उद्या शनिवारी*
गोवा, कोल्हापूर व बेळगाव येथील वेगवेगळ्या संगीतकारांनी एकत्रितपणे सादर केलेला सिंपोनी ऑफ म्युझिशियन्स हा कार्यक्रम सादर होणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.