Friday, March 29, 2024

/

रोनीतच्या माऱ्यासमोर सौराष्ट्रचा संघ गडगडला

 belgaum

बेळगावचा युवा गोलंदाज रोनीत मोरे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कर्नाटक रणजी संघ मजबूत स्थितीत आला आहे.

सौराष्ट्र विरुद्ध सुरू असलेल्या रणजी सेमी फायनल सामन्यात रोनीत याने उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे त्याने 15.3 षटकात 54 धावांच्या मोबदल्यात मिळविलेल्या पाच बळींच्या जोरावर खेळाच्या दुसऱ्या दिवशी 66.3 षटकात सौराष्ट्र ची स्थिती सात गडी बाद 227 अशी झालो आहे.

Ronit

 belgaum

बंगळुरू येथील चिन्नस्वामी स्टेडियम वर रणजी उपांत्य सामना सुरू आहे.त्यात बेळगावच्या या उदयोन्मुख गोलंदाजाने उत्कृष्ट प्रदर्शन केलं आहे. रोनीत हा उजव्या हाताने जलद गोलंदाजी करतो या मोसमात त्याने पाच बळी मिळवायची ही चौथी वेळ आहे.2018-19च्या रणजी मोसमात सर्व संघातून सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज आहे. आता पर्यंत त्याने 8 सामन्यात 35 बळी मिळवले आहेत.

संक्षिप्त धावफलक- सौराष्ट्र -227/7
कर्नाटक -275

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.