Wednesday, April 24, 2024

/

‘बेळगाव आणि बाळासाहेब’

 belgaum

आठवण बाळासाहेबांची…

एक काळ होता बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे बाळासाहेब…. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बाळासाहेबांचे अमूल्य योगदान होते बाळासाहेबांनी व्यंगचित्रा मार्फत काँग्रेस सरकारवर टीकेचे आसूड ओढले आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या माध्यमातून गुजरातला देऊ पाहणारी मुंबई मिळवली, बेळगाव कारवार निपाणीसह हा भाग कर्नाटकातच राहिला या मुद्यावर बाळासाहेबांनी अनेक आंदोलन केली.आज शुक्रवारन पासून त्यांच्या जीवना वर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट रिलीज होतोय.

1969 ला महाजन आयोगाच्या अहवालात बेळगाव शहर कर्नाटकातच राहावे असं नमूद केलं होतं याप्रश्नी बाळासाहेबांनी कठोर भूमिका घेऊन सीमाप्रश्नी मुंबईमध्ये उग्र आंदोलन सुरू केले ठाकरे यांनी बेळगाव प्रश्नी  भूमिका घ्या अन्यथा मुंबईमध्ये घुसू देणार नाही असं मोरारजींना ठणकावलं… मोरारजी ना रोखण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसैनिकांना आदेश दिले त्या आदेशाचा पालन करत कित्येक शिवसैनिक मुरारजी च्या गाडीखाली आडवे झाले आणि त्यात त्यामधले कित्येक  हुतात्मा झाले
या उग्र आंदोलनामुळे बेळगाव सीमा प्रश्न सादर केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती महाजन यांनी सादर केलेला अहवाल केंद्र सरकारला गाडुन टाकावे लागला होता. या आंदोलनातली बाळासाहेबांची भूमिका या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

 belgaum

Balasaheb

त्यानंतर 1986 साली बेळगाव कन्नड सक्ती लागू झाली त्याला विरोध करण्यासाठी बाळासाहेबांनी कोल्हापूरला बैठक घेतली त्यामध्ये शरद पवार आणि महाराष्ट्राचे विविध नेते उपस्थित होते त्या बैठकीत काहीजण असं म्हणत होते कन्नड सक्ती विरोधात आंदोलन हे महाराष्ट्राच्या सीमेवर करावं या तोडग्यावर बाळासाहेब चिडले  बाळासाहेबांना अशी बोटचेपी भूमिका मान्य नव्हती त्यांनी सुनावलं की एक तर आंदोलन बेळगावात करायचं म्हणजे बेळगावच्या भूमीमध्ये करायचं नाही तर करायचं नाहीअशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली होती.त्यानंतर शेवटी बैठकीनंतर शरद पवार आणि छगन भुजबळ नाट्यमय रित्या बेळगाव दाखल झाले कन्नड सक्ती विरोधात आंदोलन यशस्वी केले यामुळे कर्नाटक सरकारची पायाखालची वाळू सरकली होती.

2000 साली जेव्हा केंद्रात भाजपचे सरकार आलं तेव्हा वाजपेयी त्यावेळेला पंतप्रधान होते बाळासाहेबांनी वाजपेयी ना विनंती केली की बेळगावचा सीमाप्रश्न याबाबत तोडगा काढावा त्यानंतर 2002 साली कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना संयुक्तरीत्या बैठकीचे आवाहन केले.. पण कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी पाठ फिरवली त्यामुळे ही बैठक अयशस्वी झाली यावर बाळासाहेबांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली होती.

या ठाकरे चित्रपटामध्ये बेळगाव सीमाप्रश्नी बाळासाहेबांनी केलेल्या आंदोलनाला उजाळा मिळणार आहे पुन्हा बेळगाव सीमा प्रश्नाची चर्चा होणारच आहे.

साईनाथ शिरोडकर(युवा समिती सोशल मीडिया प्रमुख बेळगाव)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.