Thursday, April 25, 2024

/

निखिल जितुरीला बालशक्ती पुरस्कार

 belgaum

वडगावच्या निखिल जितुरी या धाडसी तरुणाला केंद्र सरकारने बालशक्ती पुरस्कार देऊन सत्कार करण्यासाठी निवडले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते त्याला हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

विहिरीत पडलेल्या एक बालकाला त्याने आपला जीव धोक्यात घालून वाचवले होते.याबद्दल त्याची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. १ लाख रुपये रोख, प्रमाणपत्र आणि पदक देऊन त्याला सन्मान केला जाणार आहे.

दि २२ रोजी त्याचा हा सन्मान केला जाणार आहे.१३ एप्रिल २०१८ रोजी एक बालक विहिरीत पडले होते. त्याला निखिल याने वाचवले होते.या अगोदर निखिलला ला होयसळू आणि केळदी चननमा हे राज्य स्तरीय बाल पुरस्कार मिळाले होते आता त्याच्या शौ र्याची प्रशंसा खुद्द राष्ट्रपती करणार आहेत त्यामुळे बेळगावं साठी ही एक अभिमानास्पद बाब आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.