Friday, March 29, 2024

/

‘रमेश अज्ञातस्थळी गेले नाहीत’

 belgaum

आगामी चोवीस तासात कर्नाटकातील जे डी एस काँग्रेस सरकार कोसळेल असा दावा करणारे आमदार उमेश कती यांच्या भाकीताचा चांगलाच समाचार सतीश जारकीहोळी यांनी घेतला असून त्यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे असं म्हटलं आहे.

अथणीचे आणि कागवाड आमदार दोघेही आमच्या सोबत आहेत कोणीही पक्ष सोडून जाणार नाहीत असा दावा त्यांनी केला आहे.गुरुवारी चिकोडी दौऱ्यावर ते गेले होते त्यावेळी पत्रकारांनी त्यांना हा प्रश्न विचारला असता त्यांनी वरील माहिती दिली आहे.

satish jaarkiholi

 belgaum

रमेश जारकीहोळी खाजगी दौऱ्यावर गेले असतील ते अज्ञात स्थळी नाहीत यामुळे सरकार पडणार नाही सगळं काही सुरळीत होईल असा पुनरुच्चार करत त्यांनी कोणत्याही स्थितीत उद्या मी त्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटलंय.

चिकोडी वेगळा जिल्हा निर्माण करू आजही चिकोडी वेगळा जिल्हा व्हावा यासाठी मी कटिबद्ध आहे असं देखील त्यांनी नमूद केलं आहे.कागवाड आमदार श्रीमंत पाटील अथणी आमदार महंतेश कामटोळी या दोन्ही रमेश जारकीहोळी समर्थक आमदारांशी अथनीत जाऊन त्यांनी चर्चा केली वरील वक्तव्य केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.