Thursday, April 18, 2024

/

अलारवाड क्रॉस जवळ मृतदेह सापडल्याने खळबळ’

 belgaum

‘वर्षाच्या शेवटच्या दिवशी पुणे बंगळुरू हायवेच्या शेजारी मृतदेह सापडला असून सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.घटनास्थळी माळ मारुती पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला त्या मृतक व्यक्तीच्या डोक्यात तीक्ष्ण हत्त्याराने वार करून खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.अलारवाड ब्रिजच्या बाजूला एक किलोमीटर अंतरावर शेतात एकाचा खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

मयत व्यक्तीच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केले आहेत. रविवारी रात्री हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. खून झालेल्‍या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

Murder

 belgaum

अलारवाड पुलापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर मृतदेह पडल्याचे आज सकाळी आढळून आले. ही माहिती माळमारुती पोलिसांना कळविल्यानंतर उपनिरीक्षक एस. बी. सौदागर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. खून झालेल्‍या व्यक्तीच्या डोक्यात शस्त्राने वार केल्याच्या जखमा आहेत. शिवाय त्याच्या एका हाताची तीन बोटे तुटली आहेत. बाजूला मद्याचा ग्लास, रुमाल आणि बूट पडले आहेत. या व्यक्तीवर हल्ला केल्यानंतर ती तडफडत येऊन दुसऱ्या बाजूला पडल्याचे दिसून येत असल्‍याचे पोलिसांनी सांगितले. याचा तपास सुरू असून अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

.मद्य प्राशन करण्यासाठी शेतवडीत बसल्यानंतर आपापसातील वादानंतर हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही व्यक्ती वडगाव जुने बेळगाव परिसरातील असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्या दिशेने तपास सुरू असल्याचे सौदागर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.