Friday, April 19, 2024

/

‘सी.आर.पी. एफ. प्रशिक्षण केंद्रात ब्लास्ट चौघे जखमी’

 belgaum

‘सी.आर.पी. एफ. प्रशिक्षण केंद्रात ब्लास्ट चौघे जखमी’

बेळगाव जवळील जाम्बोटी सी आर पी एफ च्या प्रशिक्षण केंद्र परिसरात स्फोट झाल्याने चार जण जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे.

जाम्बोटी तोराळी जवळील सी आर पी एफ कॅम्प परिसरात ही घटना घडली आहे. सी आर पी एफ पोलिसांनी जखमींना बेळगावातील एका खाजगी इस्पितळात दाखल केले आहे.

 belgaum

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी पाटील वय 47,महादेव नायक वय 60,बाळकृष्ण पाटील वय 48 आणि रामलिंग पाटील वय 47 सर्वजण रा. तोराळी अशी जखमींची नावे आहेत.

तोराळी भागातील कोब्रा ट्रेनिंग सेंटर मधील निर्बंधित प्रदेशात जनावरे चारवायला गेलेले शेतकरी या घटनेत जखमी झाले आहेत. सदर जागा फायरिंग रेंज मध्ये येते त्या ठिकाणी ब्लास्ट झाल्याने ही घटना घडली आहे. या प्रकरणी खानापूर पोलिसांत घटना नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.