Tuesday, April 23, 2024

/

‘उद्या पुन्हा रहाणार ब्लॅक संडे’

 belgaum

काही तात्काळ दुरुस्ती कामे करावी लागत असल्याने उद्या हेस्कोम बेळगाव शहर भागातील विजसेवा बंद ठेवणार आहे. सकाळी १० ते ५ यावेळी वीज नसणार असून ब्लॅक संडे चा अनुभव घ्यावा लागेल.

इंडाल, ऑटो नगर, वैभव नगर, महानतेश नगर, शिवाजी नगर, शिवबसव नगर, आयसीएमआर, जिनबकुल फोर्ज, सिव्हिल हॉस्पिटल, आझाद नगर, फोर्ट रोड, शेट्टी गल्ली, खडेबाजार, धारवाड रोड, बसवण कुडची, कॅन्टोन्मेंट, नानावाडी, हिंदवाडी, मारुती गल्ली, शहर, टिळकवाडी, शहापूर, पाटील गल्ली, हनुमान नगर, सह्याद्री नगर, उद्यमबाग, बेंको, अशोक आयर्न, गुरू प्रसाद कॉलनी, महावीर नगर, कणबर्गी, रामतीर्थ नगर येथे वीज पुरवठा करणारी फीडर्स बंद राहणार असून या भागात विजसेवा नसेल.

थोडक्यात पूर्ण शहराला वीज नसणार आहे.त्यामुळे लोकांना पर्याय शोधावा लागेल. हेस्कॉन विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माहिती दिलीय.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.