Wednesday, April 24, 2024

/

‘निस्वार्थी आणि एकाकी काँग्रेस कार्यकर्त्याचा अलविदा’

 belgaum

भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी स्थापन झालेला काँग्रेस पक्ष, पुढे स्वातंत्र्य मिळाल्यावर सत्ता गाजवणारा हाच पक्ष आणि आत्ता लाट बदलल्यावर पराभवाच्या वातावरणात होरपळून जात असलेली याच पक्षाची नवी पिढी हे सर्व जवळून पाहात….. निष्ठा जपत….. स्वार्थाला जवळ न करता आणि कुठलाच लाभ न घेता कसलीही तक्रार न करता एकाकी जीवन जगणारे मिरजकर मामा यांनी या जगाला अलविदा म्हटले आहे.मृत्यूनंतरही त्यांच्या पदरी उपेक्षाच आली हे दुर्दैव….

मुरलीधर गजानन मिरजकर ( वय ८०) हे या सच्च्या काँग्रेसी कार्यकर्त्याचे नाव. अनेकजण मागून येऊन पुढे गेले, आमदार खासदार आणि मंत्री झाले, पण गळ्यात एक डगला आणि अंगावर काँग्रेस सेवादलाचा खाकी ड्रेस घालून मिरजकर मामा तडफडत राहिले. तरुण ऐकत नाहीत हो त्यांना फक्त पदे पाहिजेत अशी खंत बाळगत आणि तरीही बापूजी, नेहरुजी आणि इंदिराजींची आठवण सांगत त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.

Mirajkar congress
ते भेंडीबाजार येथे वास्तव्यास होते. घरी पडून मार लागल्याने ते आजारीच होते.त्यातच त्यांचे निधन झाले आहे.वय झालं होतं.काँग्रेसच्या नेत्यांनी जन्मभर त्यांचा फक्त उपयोग करून घेतला पण त्यांच्या भल्याचा कधीच विचार केला नाही. आठ वर्षांपूर्वी एकदाच भु लवाद मंडळाचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली होती, त्याव्यतिरिक्त त्यांना कोणताच लाभ करून दिला गेला नाही सुरुवातीपासून काँग्रेसच्या राष्ट्र सेवा दलाचे ते निष्ठावन्त सदस्य म्हणूनच कार्यरत राहिले.

 belgaum

Nandu।mirajkar
फुलबाग गल्ली येथील जुन्या काँग्रेस कार्यालयाची सारी व्यवस्था ते सुरुवातीपासून बघत आले. काँग्रेसने नवे कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आणि मिरजकर मामा हरवून गेले.
मिरजकर यांच्या अंत्यविधीलाही एक नगरसेवक आणि एक दोन कार्यकर्ते वगळता कोणीच पद भूषवणारे किंव्हा यापूर्वी पद भूषवलेले उपस्थित नव्हते. नगरसेवक बाबूलाल मुजावर, काँग्रेसचे जुने नेते बाबूलाल बागवान आणि सध्याच्या पिढीतले फैझान सेठ वगळता इतर कोणी त्यांना निरोप द्यायलाही आले नव्हते.
मिरजकर यांचे योगदान पाहून त्यांना बुडा अध्यक्षपद मिळावे अशी मागणी काही जुन्या कार्यकर्त्यांनी केली होती पण त्यांची वेळ कुणी येऊ दिली नाही. काँग्रेस कार्यालयात झाडलोट करण्यापासून सर्व कामे करत राहिलेला हा एकमेव प्रामाणिक कार्यकर्ता मात्र दुर्लक्ष होऊन संपून गेला.
काँग्रेस जिल्हा अध्यक्षतेखाली दोड्डाणावर आणि नेसर्गी हे असतानापासून त्यांनी काम केले आहे.आज त्यांच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेस पक्षाच्या कार्यात मिळणे अवघड आहे. माजी केंद्रीय मंत्री बी शंकरानंद यांच्या कार्यकाळात त्यांनी मोठे काम केले आहे.
त्यांच्या अंत्यविधीला काँग्रेसचे  मोठे नेते कार्यकर्तेही उपस्थित राहिले नाहीत हे दुर्दैव ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.