Wednesday, April 24, 2024

/

उद्या सर्व शाळांना सुट्टी द्या पालकांतून होत आहे मागणी

 belgaum

उद्या शनिवार दि १५ रोजी बेळगाव शहरात राष्ट्रपती, राज्यपाल, सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश ,मुख्यमंत्री,उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या सह अनेक मंत्री येणार आहेत. उद्यमबाग येथील जी आय टी कॉलेजच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या निमित्ताने बरेच रस्ते बंद केले जाणार असून विद्यार्थी व पालकांची गैरसोय होणार आहे.यासाठी पालकातून सर्व शाळांना उद्या सुट्टी देण्याची मागणी होत आहे.

President of india

बेळगाव शहराला शनिवारी होणाऱ्या व्ही व्ही आय पी व्हिजिट मुळे शहरातील ट्रॅफिक व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आले असून याचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टीचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
*हे रहदारी बदल होणार*
शनिवारी सकाळी ८.३० ते दुपारी १.३० पर्यंत काही रोड व मार्ग बदल, तर काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

 belgaum

President drill

१५ सप्टेंबर रोजी पहिला रेल्वे गेट व दुसरा रेल्वेगेट मार्ग हा रहदारी साठी पूर्ण बंद करण्यात आला आहे.याला पर्यायी मार्ग म्हणून ओल्ड पी बी रोड आणि कपिलेश्वर रोडचा वापर करावा लागणार आहे.

बेळगाव खानापूर रोड NH4A वर शहरात कुठेही गाडी पार्किंग करू नये, अशीही सुचना करण्यात आली आहे.

विमान तळ ,सांबरा रोड, एन एच 4 हायवे ,लेक व्यु क्रॉस,अशोक सर्कल ते राणी चनम्मा चौक,कॉलेज रोड,खानापूर रोड काँग्रेस रोड वर पार्किंग करू नये अशी सूचना आहे.

विजापूर बागलकोट आणि यरगट्टी कडून येणाऱ्या वाहनांनी मारिहाळ पोलीस स्थानका पासून सुळेभावी मार्गे रस्त्याचा वापर करावा लागेल तर सांबरा ब्रिज ,महंतेशनगर ब्रिज अशोक सर्कल कडून येणाऱ्या भाजीच्या गाड्या एन एच 4 ते बी एस येडियुराप्पा मार्ग कडून घ्याव्या लागतील.

गोव्या कडून येणाऱ्या सर्व बस पिरनवाडी जवळ अडवण्यात येतील आणि तिथूनच परत जातील उरलेली वाहने पर्यायी मार्गाने जातील.

हायवे जवळ अशोक नगर चौथ्या क्रॉस जवळील खुल्या जागेत कोल्हापूर धारवाड आणि गोकाक कडून येणाऱ्या गाड्या अडवल्या जातील आणि तेथूनच चालवल्या जातील.

धर्मनाथ सर्कल पासून सिटी बस चालवल्या जातील.
या वातावरणात मुलांना शाळेला पाठवणे कठीण असून शाळांना सुट्टी देण्याची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.