Tuesday, April 16, 2024

/

हुबळीला कार्गो आणि बेळगावला काय?

 belgaum

बेळगावला डावलून हुबळी विमानतळाचा विकास सुरू आहे. आकाराने लहान आणि कमी सुविधा असलेल्या या विमानतळावर बेळगाव पेक्षा जास्त विमानसेवा आहेत. बेळगावला असलेल्या सर्व सेवा जास्तीतजास्त हुबळीला गेल्या आहेत आणि आता एअर कार्गो सेवाही सुरू करण्यात येणार आहे यामुळे बेळगावला काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राजकीय वर्चस्व असले की काय होते याचे चित्र आता हुबळी आणि बेळगावच्या बाबतीत पाहिले तर लक्षात येत आहे. जगदीश शेट्टर आणि प्रल्हाद जोशी यांनी आपले वजन वापरून हुबळी विमानतळाचे महत्व वाढवून घेतले आहे. यामुळे बेळगाव विमानतळाचे महत्व कमी झाले आहे.
बेळगावच्या खासदारांनी फक्त निवेदन देण्यापलीकडे आपले वजन वापरले नाही यामुळे याचा फटकाच बसत आहे. बेळगावचे उद्योजक आणि अधिकाऱ्यांना लवकर प्रवास करायचा असल्यास हुबळी विमानतळाचा आधार घ्यावा लागत आहे.

AIRport
आतातरी हे बेळगावचे खासदार जागे होतील अशी अपेक्षा आहे. उडाण च्या यादीत बेळगाव विमानतळाचा समावेश करण्याची हीच योग्य वेळ असून या खासदारांनी प्रयत्न केले तरच काहीतरी हातात मिळू शकेल.

हुबळी तुन बंगळुरू मुंबई चेन्नई हैद्राबाद गोवा अहमदाबाद अश्या विमान सेवा दररोज सुरू आहे किमान 16 विमाने रोज हुबळी येत असतात उड्डाण योजनेत हुबळी समाविष्ट आहे मात्र हुबळी पेक्षा क्षमतेने ऐतिहासिक आणि विमानतळ असताना बेळगावला केवळ एकच विमान आहे यापेक्षा मोठे दुर्दैव काय असेल?

 belgaum

1 COMMENT

  1. Yes, I endorse that nothing is happening for Belgaum. We all industrialists and business community tried our BEST to persue regular flight to Mumbai and other cities as also for the Cargo service. But Belgaum lack political will as usual as our so called leaders just SUBMIT memorandums, take photos and forget. Sombody should seat on the head of concerned people at Delhi and get it done. Compliments to Shri Pralhad Joshi most efficient MP from Hubli who brings every possible thing to his constituency.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.