Thursday, April 25, 2024

/

‘पांढरा हत्ती बनलाय हिरवा’

 belgaum

बेळगाव येथील हलगा-बस्तवाड येथे उभारण्यात आलेल्या सुवर्ण सौधची अवस्था दयनीय बनत चालली आहे. उत्तर कर्नाटकातील सत्ता केंद्र बनवण्यासाठी कोटयवधी रुपये खर्च करण्यातआले मात्र पांढरा रंग हिरवा होत आहे.

बेळगावात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कर्नाटक सरकारकडून वापरण्यात येणारा हा पांढरा हत्ती काही दिवसांपासून हिरवा हत्ती बनलाय. त्यामुळे आता हिरवा असलेला पुन्हा हा हत्ती पांढरा करण्यासाठी पैसा वाया घालावा लागणार आहे.

Green suvarn soudh

 belgaum

हलगा येथे मोठ्या दिमाखात 500 कोटी रुपये खर्च करून सुवर्ण विधान सौध बांधण्यात आली आहे. त्याचे देखभालीसाठी अनेक कामगारांची नियुक्ति करण्यात आली आहे. दर वर्षी सुवर्ण सौध च्या देखभालीसाठी तब्बल दहा कोटी खर्च केला होतो हा पैसा केवळ वर्षातून पंधरा दिवस अधिवेशन घेण्यासाठी खर्चिला जातो

सध्या बेळगाव परीसरात पावसाचे प्रमाण मागील वर्षीपेक्षा अधिक आहे याच पावसाने इमारतीला हिरवा शेवाळ धरलं आहे पांढरा असलेला रंग हिरवट दिसत आहे.केवळ इमारत नव्हे तर आतील काँक्रेट रोड देखील वापरात नसल्याने शेवाळ पकडून घसरण निर्माण झाली आहे.गेल्या काही दिवसात बंगळुरू मधील राज्य स्तरीय शासकीय कार्यालये सुवर्ण सौध मध्ये स्थलांतरीत करा अशी मागणी जोर धरली होती अश्यात वापर नसल्याने सौध इमारत हिरवी बनली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.