Thursday, April 25, 2024

/

हरिकाका कंपाऊंड कडे तुमचं दुर्लक्ष का?

 belgaum

हरिकाका कंपाउंड गांधीनगर येथील रस्त्याची दुरावस्थे मुळे मोटार कामगार त्रस्त झाले आहेत वारंवार महापालिका व आमदारांचे दार ठोठावून सुध्दा कोणतेच सहकार्य मिळत नाही आजही या भागात विविध समस्या जश्यास तश्याच आहेत.अनेकदा पालिका प्रशासन आणि महापौरांना निवेदन देऊन याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.

जे सरकारी कर्मचारी कर घ्यायला वेळेत येतात ते अशा समस्या सोडवण्यासाठी कोठे असतात ? असा आमचा सवाल आहे. वारंवार या भागात गॅरेज कारखान्या मधून रात्रीची चोऱ्या होत आहेत तरी देखील शासनाने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक करताहेत.

Harikaka compoundविद्युत खांबावर दिवे बसवण्याची मागणी आमदार अनिल बेनके यांच्याकडे केली होती त्यावेळी ‘आमदारांनी उद्या लाईट बसले समजा’ असे आश्वासन दिले होते मात्र अध्याप आमदार या भागात फिरकलेच नसल्याचा आरोप येथील लोकांनी केलाय.

 belgaum

एकीकडे बेळगावला स्मार्ट सिटी करू असे अधिकारी लोकप्रतिनिधी मोठया आव आणून सांगत असतात मात्र शहराचाच एक भाग असलेल्या हरिकाका कंपाऊंड कडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातंय.लवकरात लवकर शासन आणि लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष देऊन समस्या सोडवाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
किरण मोदगेकर , लक्ष्मण गोमाणाचे ,रमेश मोदगेकर ,कृष्णा पटिल , गोपाळ हंडे , बाळकृष्ण पाटील यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.