Friday, March 29, 2024

/

बेळगावचे रमाकांत आचेरकर गुरुजी…

 belgaum

प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी क्रिकेटचा देव सचिन घडवला अन आचरेकर सरांना जग ओळखू लागल तसच बेळगावात देखील अनेक गुरु द्रोणाचार्य आहेत त्यात रवी मालशेट हे नाव सर्वात पुढे येतंय. गुरु पौर्णिमे निमित्य जाणून घेऊयात बेळगावच्या रमाकांत आचरेकरांच्या बद्दल…
बेळगाव शहरातून राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धातून नेतृत्व केलेल्या खेळाडूंची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. त्यातच यातील अर्धे खेळाडूना प्रशिक्षित करण्याचा मान एकट्या या बेळगावच्या द्रोणाचार्याना जातो. रविकांत मालशेट असं या क्रिकेट प्रशिक्षकाच नाव असून ते शाळेतील क्रीडा शिक्षक, क्रीडा पत्रकारिता ते क्रिकेट प्रशिक्षक अशी तिहेरी भूमिका बजावत असतात आणि बेळगावात विजया क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून उदयोन्मुख खेळाडूना क्रिकेटचे धडे देत असतात.

RAvi malshet
मालशेट यांच्याच भात्यातून अनेक रणजी पटू तयार झालेत त्यात वैभव गोवेकर यांची गोवा रणजी संघात खेळत आहे तर या अगोदर दीपक चौगुले याने १७ वर्ष खालील आशिया स्पर्धेत एकदा तर १९ वर्ष खालील विश्व कप दोनदा भारतीय टीम मध्ये स्थान मिळवलं होत याशिवाय त्याने कर्नाटक रणजी संघात देखील तो खेळला होता सर्वात अगोदर मिलिंद चव्हाण यांनी १३ वर्ष खालील कर्नाटक तर गोव्याच्या रणजी संघात अनेक सामने खेळले होते.
सध्या अथर्व धर्माधिकारी १७ वर्षा खालील आणि १९ वर्षा खालील महाराष्ट्र संघातून कूच बिहार ट्रॉफी आणि सी के नायडू ट्रॉफी सलामीवीर फलंदाज म्हणून खेळत आहे.१९७८ पासून ते खेळाडूना प्रशिक्षण देण्याच काम करत आहेत .
दर वर्षी गुरु पौर्णिमेला खेळाडू मला भेटून आशीर्वाद घेत असतात फुटबॉल आई क्रिकेट या दोन्हीतून मधून जवळपास प्रत्येकी २५०० खेळाडूंनी युनिव्हर्सिटी ब्लू किताब मिळवला असल्याचा दावा मालशेट यांनी बेळगाव live शी बोलताना केला आहे. सध्या दोन फुटबॉल खेळाडूभायोचींग भुतिया स्पोर्ट्स अकादमीत खेळणार आहेत तर एकटा ए एस सी बंगळूरू मध्ये खेळणार असल्यचेही त्यांनी सांगितले.
संपर्क -रवी मालशेट
+919343165093

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.