राज्यातील संमिश्र सरकारचा बजेट सर्कस सक्सेस राज्यातील जिल्हा पालक मंत्र्याची संभाव्य सूची जाहीर करण्यात आली आहे. बेळगावचे पालक मंत्री आणि राज्याचे नगर प्रशासन मंत्री रमेश जारकीहोळी यांना बेळगाव या राज्यातील मोठ्या असलेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदा बरोबर हुबळी धारवाड जिल्ह्याचे पालक मंत्री पद देखील मिळणार आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालक मंत्र्यांच्या यादीत हुबळी धारवाड देखील रमेश जारकीहोळी यांच नाव आहे.
महाराष्ट्रात होत असलेल्या संततधार वृष्टीमुळे कृष्णा नदीची पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे अनेक घरांची पडझड झाली आहे त्यामुळं जिल्ह्यात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे अश्यात नुकसान भरपाई देणे आणि पूर नियंत्रण करण्यासाठी के डी बैठक बोलवा आणि राज्यातले पालकमंत्री नियुक्त करा अशी मागणी आमदारांनी केली होती त्यामुळं सर्व पालक मंत्र्यांची संभाव्य यादी जाहीर करण्यात आलीय.
जिल्हा पालक मंत्र्यांच्या नियुक्ती बरोबर मंत्री मंडळाचा विस्तार देखील होणार आहे त्यामुळं बेळगावला आणखी एक मंत्री पद मिळतंय की काय अशी देखील शक्यता आहे.मंत्री रमेश जारकीहोळी यांना बेळगाव सोबत धारवाड पालकमंत्री पद मिळाल्यास तो बोनस ठरणार आहे.अजमेर दौऱ्या वेळी रमेश जारकीहोळी नाराज आहेत अश्या देखील बातम्या आल्या होत्या त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना डबल बोनस मिळतोय अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
गेल्या चार दिवसा पूर्वी रमेश जारकीहोळी सह त्यांच्या 13 समर्थक आमदारांनी राजस्थान येथील सुफी संत अजमेरचे खवाजा मोईनुद्दीन चिस्ती यांच्या दर्ग्यास चादर अर्पण करून आशीर्वाद मागितला होता त्यांना डबल पालकमंत्री पद मिळाल्याने त्यांनी अजमेर मध्ये केलेली दुवा कबूल झाली असेल असेच त्यांचे समर्थक म्हणत असतील.