Saturday, April 20, 2024

/

‘ त्यांनीं खड्ड्यांना घातले हार’

 belgaum

खड्डे मुजविण्यासाठी अनोख्या पद्धतीने अनेक जण आंदोलन करून संबंधितांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात.पण बेलगावमधील सामाजिक कार्यकर्ते आणि पेशाने वकील असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी मात्र आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडून समस्येकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय.त्यांनी शहरातील तीनशेहून अधिक खड्ड्यांचे पुष्पहार घालून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

Khadda garland
तिसरा रेल्वे गेट काँग्रेस ते उभ्या मारुती पर्यंत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे इथून ये जा करणाऱ्यांची दैना उडत असताना प्रशासनाने केलेली डोळेझाक उघडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि वकील हर्षवर्धन पाटील यांनी अनोखं आगळ वेगळं आंदोलन हाती घेतलं होतं.गुरुवारी सकाळी हर्षवर्धन पाटील आणि सहकाऱ्यांनी काँग्रेस रोडवर पडलेल्या प्रत्येक खड्ड्याला हार अर्पण केला आहे.

शहरातील रस्ते स्वच्छ आणि सुंदर ज्यावेळी होतील रस्ते चालायला आणि गाडी चालवायच्या योग्यतेचे होतील त्याच वेळी शहर स्मार्ट सिटी बनण्याकडे वाटचाल होईल.
बेळगाव शहरात गाडी चालवतेवेळी रस्ता खड्ड्यात खड्ड्यात रस्ता अशी अवस्था असताना प्रशासन गप्प आहे प्रशासनाचे डोळे उघडावे म्हणून  300  हुन अधिक खड्डयांना हार घालून आम्ही सर्वांचं लक्ष वेधलंय अशी प्रतिक्रिया वकील हर्षवर्धन पाटील यांनी live कडे दिलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.