Friday, March 29, 2024

/

‘थॉयराईड’-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

थॉयराईड ही एक अंत:स्त्रावी ग्रंथी असून गळ्याच्या दर्शनीभागात स्थित असते. श्‍वासनलिकेवर ही ग्रंथी चिकटलेली असून त्यामधून रक्तवाहिन्यांचे सूक्ष्म जाळे विणलेले असते. त्यामुळे कोणत्याही वाहकनलिकेशिवाय थॉयराईड ग्रंथीचे स्त्राव रक्तामध्ये मिसळले जातात. याकरिता या ग्रंथी अंत:स्त्रावी ग्रंथींमध्ये समाविष्ट होतात. शरीराच्या सर्व चयापचयाच्या क्रिया या ग्रंथीकडून नियंत्रित केल्या जातात. अर्थात या ग्रंथीला शरीराचा प्रधानमंत्री म्हणण्यास हरकत नाही. यावर पिट्यूटरी नावाचा मेंदूमधील ग्रंथीचे नियंत्रण असते. जी राष्ट्रपतीचे कार्य बजावते. शरीरातील कोणतीही क्रिया स्थितीच्या बाहेर चालली की लगेच वटहुकूम जारी होऊन स्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला जातो.

THoiroid
तरीही इतके सगळढे नियंत्रणकक्ष असूनसुद्धा एखाद्या कामचुकार व्यक्तीप्रमाणे एखादवेळेस या ग्रंथीचे काम बिघडतेच. या ग्रंथीतून स्त्रवणारे स्त्राव प्रमाणापेक्षा कमी जास्त होऊ शकतात. स्त्राव कमी झाल्यास ‘हायपरथायरॉईडिझम’ व स्त्राव जास्त झाल्यास ‘हायपरथायरॉईडिझम’ म्हटले जाते. स्त्रियांना हा विकार जास्त प्रमाणात होतो. मासिक पाळीच्या सुरुवातीला किंवा ऋतुनिवृत्तीच्या वेळेत हा विकार होण्याचा जास्त संभव असतो. अतिश्रम, अतिताण, खाण्यापिण्याच्या अनिर्बंध सवयी, कुपोषण, मधुमेह, काही औषधांचा बेछूट वापर यामुळे थॉयराईडविकार होऊ शकतो.
लक्षणे
हायपोथॅराईडिझममध्ये शरीरातील चपापचयाच्या क्रिया मंदावतात. त्यामुळे गुग्णाच्या हालचाली मंदावतात. त्वचा जड व खरबरीत होते. चेहर्‍यावर, अंगावर सूज चढते. वजन वाढते, अवाजवी थंडी वाजते. केस चरबट होऊन गळू लागतात. केसांची चमक जाऊन रुक्ष होतात. कधी शौचास अविरोध होतो. पोट साफ होत नाही तर कधी जुलाब होतात. सांधे आखडतात, जीभ जड होते, आवाज खरखरीत होतो. मासिक पाळी लांबते, रक्तस्त्राव कमी होतो.
याविरुद्ध हायपरथॉयरॉईडिझममध्ये थॉयराईडचे स्त्राव वाढून चयापचजयाचा वेग वाढतो. खाल्लेले अन्न वाजवीपेक्षा जास्त वेगाने पचते व शोषणप्रक्रियादेखील व्यवस्थित न होता, अन्नरस शरीरात शोषले न जाता वजन कमी होऊ लागते. थकवा, चिडचिडेपणा, हात थरथरणे, डोळे बटबटीत होऊन बाहेर आल्यासारखे वाटतात. भरपूर घाम येतो. त्यामुळे एकदम अशक्तपणा येतो. हृदयाची धडधड आल्यासारखा दिसतो. सतत भीती वाटणे, अस्वस्थ वाटणे अशीही लक्षणे दिसून येतात. त्वचा पातळ व नाजूक होते. शौचाला सारखे जावेसे वाटते. क्वचित जुलाबही होतात. मासिक पाळी लवकर होते. रक्तस्त्राव जास्त होतो.
कारणे : थॉयरॉईड ग्रंथीतून स्त्रवणारे संप्रेरक (हार्मोन) कमी जास्त झाल्यामुळे असे विकार होतात. पिट्यूटरी व थॉयराईडच्या जन्मजात दोषामुळे, अनुवंशिकतेमुळे बव्हंशी हा विकार होतो. तसेच अवाजावी मानसिक व शारीरिक ताण, सदोष आहार विहार पद्धती, व्यसने, दुचारास यामुळे शरीराचे संतुलन बिघडुन अशा आजारांना आमंत्रणच मिळते. शरीरातून विषारी पदार्थांचे उत्सर्जन न झाल्यामुळेही सगळ्या सिस्टीमवर ताण येऊ शकतो तयार केलेले अन्नपदार्थ सारखे शिजवल्यामुळे, गरम करण्यामुळे त्यातील अन्नघटकातील आयोडिनचा नाश होतो. साखर, मीठ, सोडा आणि मैदा यांचे अतिशुध्द स्वरूप मानवी शरीराला घातक असते. पर्याय म्हणून गूळ, सैंधव, कोंड्यासकट गव्हा/ ज्वारीचे पीठ वापरल्याने शरीराची क्रशयक्ती वाढते.
योग- योगसाधनुमुळे शारीरिक व मानसिक बळ वाढते.
होमिओपॅथी- अर्थातच संप्रेरकांच्या कृत्रिम पुरवठ्याबरोबरच संपूर्ण समतोल साधण्यासाठी होमिओपॅथीक औषधे अतिशय महत्वाचे कार्य बजावताता. स्पाँजिया, थायरॉईडिनम, कॅल्केरिया कार्ब, आयोडिनम अशी औषधे वैद्यकीय सल्ल्यानुसार वापल्यास संप्रेरकांचा समतोल साधणे सुलभ जाते.

Dr sonali sarnobatसंपर्क -डॉ सोनाली सरनोबत
सरनोबत क्लिनिक – 9964946818
केदार क्लिनिक- 9916106896

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.