Thursday, April 18, 2024

/

बेळगाव live इम्पॅक्ट ‘राष्ट्र ध्वज हलवले बुडा कार्यालयात’

 belgaum

उशिरा का होईना बेळगावचे प्रशासन जागे झाले आणि अडगळीत टाकलेले ते चार ध्वज अखेर बुडा कार्यालयात हलवण्यात आले आहेत. मनपा आयुक्त शशीधर कुरेर यांनी हा प्रकार करणाऱ्या संबंधीत कंपनीला नोटीस दिली आहे. फक्त नोटीस देऊन चालणार नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे.

मनपा आयुक्तांनी आपण केलेल्या कारवाईची माहिती बेळगाव मीडिया फोर्स या पत्रकारांच्या वॉट्स अप ग्रुपवरून दिली आहे. चारही ध्वज थेट बुडा कार्यालयात हलवण्यात आले आहेत. बेळगाव live ने ही बातमी दिली नसती तर ते ध्वज तसेच पडून राहिले असते त्यामुळे संबंधीत कँपनी बरोबरच इतके दिवस दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची गरज असून त्याकडे आता पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

LIve impact
काय होती बेळगाव live ची बातमी?

 belgaum

मोठा गाजावाजा करून आणि तांत्रिक गोष्टींकडे दुर्लक्ष करून बेळगावच्या किल्ला परिसरात उभा केलेला सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्याचा उपक्रम मागे पडला आहे. वारंवार पाऊस आणि वाऱ्याने ध्वजाचे कापड फाटू लागल्याने फक्त रिकामा पोल उभा आहे. आणि त्यावर फडकवण्याच्या ध्वजाचे काय झाले? याचा शोध बेळगाव live ने घेण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बातमी मिळाली आहे. हे ध्वज सन्मानाने ठेवण्यात आलेले नाहीत, तर त्यांचा अवमान करण्यात येत आहे.
राष्ट्रीय ध्वज संहितेनुसार ध्वज अतिशय सन्मानाने ठेवणे गरजेचे आहे, पण तसे न करता ते चुकीच्या ठिकाणी ठेवण्यात आले असून राष्ट्रीय ध्वजाचा अवमान सुरू आहे.
याच किल्ला परिसरात एक ध्वज जमिनीवर टाकून देण्यात आला आहे. दुसरा ध्वज एका सिंटेक्स टाकीवर ठेवण्यात आला आहे. तिसरा ध्वज एका गटारीवर पडून आहे तर त्याच शेजारी एका कपड्यात गुंडाळून चवथा ध्वज ठेवण्यात आला आहे.
या ध्वजांची व्यवस्थित घडी घालून ते एका बंदीस्थ खोलीत किंवा कपाटात ठेवले पाहिजे होते, पण तसे न करता ते चुकीच्या प्रकारे ठेवले गेले आहेत. या गोष्टीकडे पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने दुर्लक्षच केले आहे.
याप्रकारे ध्वजाचा अपमान म्हणजे देशाचा अपमान आहे पण याकडे लक्षच देण्यात आले नाही. असेच होत राहिल्यास भारतीय तिरंगा ध्वजा च्या अवमानाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची गरज आहे. देशप्रेमी नागरिक आणि सामाजिक संघटनांनी याकडे लक्ष देऊन हा अवमान थांबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

national flag
जिल्हाधिकारी लक्ष द्या
फक्त नोटीस देऊन चालणार नाही. आता जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला हवे. बातमी येईपर्यंत झोपलेल्या संबंधीत अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी.
केवळ नोटीस देऊन काहीही होणार नसून काम चुकारू पणा केलेल्या अधिकाऱ्यावर देखील कारवाई झाली पाहिजे त्यांचं निलंबन झालं पाहिजे अशी देखील मागणी सोशल मीडियातुन केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.