Friday, March 29, 2024

/

कावळ्याला जीवनदान…

 belgaum

मांज्याच्या दोऱ्यात अडकलेल्या कावळ्याला तीन युवकांच्या प्रयत्नामुळे जीवदान मिळाले आहे. कावळ्याचा कुणाला स्पर्श झाला तर अपशकुन मानतात आणि शांती करून घेतात.पण कोणतेही शकुन अपशकुन न मानता कावळ्याला जीवदान दिलेल्या युवकांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे.

Youths Crow saved life

 

 belgaum

बस स्थानकाजवळील फॉरेस्ट खात्याच्या कार्यालया समोरील झाडावर मांज्याच्या दोऱ्यात अडकलेल्या कावळ्याला  जीवदान मिळालं आहे.आंतरराष्ट्रीय पैलवान अतुल शिरोळे,अमित अस्वले आणि अभय बेळगुंदकर या तिन्ही युवकांनी प्रयत्न करून कावळ्यास जीवदान देऊन आपल्या पक्षीप्रेमाचे दर्शन घडवलेआणि अंधश्रद्धा पण दूर केली आहे.

फॉरेस्ट ऑफिस समोर रोडवर असलेल्या झाडाजवळ कायम गर्दी असते वाहनांची वर्दळ असते मात्र उंच झाडावर अडकलेल्या कावळ्यास वाचवण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले साहित्याची जमवाजमवं केली उंची वरून कावळ्याला शिताफीने वाचवलं.सकाळी 11 वाजता कावळा झाडावर अडकलेला कावळ्यास वाचवून त्यांनी कावळ्यास पाणी पाजवून त्याच्यावर प्राथमिक उपचार करून वन खात्या कडे सुपूर्द केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.