Friday, April 19, 2024

/

‘कोदाळी वन खात्यावर गुन्हा घाला’ – तिलारी लष्कर पॉईंटवर आंदोलन 

 belgaum

वन विभागाच्या ताब्यात असलेल्या तिलारी घाटातील लष्कर पॉईंटवर योग्य ती खबरदारी घेतली नाही पूर्ण ठिकाणाला संरक्षक कठडे लावले नाहीत त्यामुळेच  अपघात घडला आणि त्यातच बेळगावातील पाच युवकांचा मृत्यु झाला असा आरोप करत अपघात स्थळीच आंदोलन करण्यात आले. चंदगड शिवसेनेचे अड. मळवीकर आणि  जे.के पाटील यांनी  भर पावसात अपघात स्थळी सोमवारी जोरदार आंदोलन करून निदर्शन केली.

रविवारी सायंकाळी कोदाळी हद्दीतील लष्कर पॉईंट वर अपघात होऊन बेळगाव मधील पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्याचे आज पडसाद  सोमवारी उमटले. चंदगड मधील  कार्यकर्त्यांनी थेट अपघात स्थळाजवळ प्रशासनाच्या निषेधात जोरदार घोषणाबाजी केली चीड व्यक्त केली.

tilari ghat andolan

 belgaum

वन विभागावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे बराक पूर्ण झाली पाहिजेत, 100 मीटर अगोदर चर मारली पाहिजेत ह्या प्रमुख मागण्यासाठी अड. मळवीकर व जे.के.पाटिल यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले.बेळगावचे युवक अपघातात मयत होण्यास वन खाते जबाबदार आहे दोन वर्षापूर्वी चार जणांना मिळून एकूण या ठिकाणी ९ जणांना अपघातात जीव गमवावा लागला आहे या अगोदर देखील अपघात होऊन देखील वन खात्याला जाग आली नव्हती त्यामुळे या अपघातास वन खाते जबाबदार आहे असा देखील आरोप करण्यात आला.

चंदगड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यादव व पोलीस उप अधिक्षक अनिल कदम यांनी दिलेल्या हमी नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी देमाना पाटील, संभाजी मळविकर, अनिल गावडे, बाळू कुऱ्हाडे, रघु नाईक आदी तालुक्यातील लोक हजर होते.रविवारी या अपघातात मयत झालेल्या पाचही जणांवर सोमवारी बेळगावात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.

न्यूज अपडेट : अनिल तळगुळकर चंदगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.