Saturday, April 20, 2024

/

‘मेकॅनिकचा मूलगा बनला बेंझचा इंजिनियर’

 belgaum

बेळगावच्या एक गरीब कुटुंबात राहणाऱ्या युवकाची जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मर्सिडीज बेंझ कंपनीच्या संशोधन (R&D)विभागात निवड झाली आहे.त्याच्या पूर्वजांच्या दोन पिढ्यानी वाहन दुरुस्तीचा व्यवसाय केलाय मात्र
तिसऱ्या पिढीतील हा युवक जगातील अव्वल कार कंपनीत संशोधनाचे काम करणार आहें त्याने
बेळगावच्या युवा पिढी व विद्यार्थ्यांत एक नवीन आदर्श घालून दिलाय.

Sourabhसौरभ उदय माळवी असे या युवकाचे नाव….सौरभचे आजोबा व वडील वाहन दुरुस्तीचा व्यवसाय करत होते. गरीब परिस्थितीतून व अथक परिश्रमातून शिक्षण घेऊन एक प्रेरणादायी आदर्श त्याने घालून दिलाय.गाडेमार्ग शहापूर येथे राहणाऱ्या सौरभने आतंरराष्ट्रीय कंपनीत आपलं टॅलेंट दाखवणार आहे.अगदी लहानपणापासूनच त्याला मोठ्या कंपनीमध्ये काम करण्याचे ध्येय होते. व त्याने जिद्दीच्या जोरावर ते पूर्ण करून दाखवले. अनेक सामाजिक संस्था, शिक्षक वर्ग व मित्रांच्या मदतीने त्याने हे शिखर गाठले आहे.

पहिले ते दहावी पर्यंतचे शिक्षण त्याने मराठी माध्यमातून पूर्ण केले. त्याचे वडील मेकॅनिक म्हणून काम करत होते पण जशी जगाची दशा आणि दिशा बदलत जात आहे तसेच त्यांच्या वडिलांनी हि घरची परिस्थिती पाहता ट्रक चालक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. सौरभच्या आई शेतमजुरी काम करत घराला हातभार लावते. माध्यमिक शिक्षण घेत असताना शाळेची फी भरण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. त्यावेळी शिक्षक व अनेक सामाजिक संस्थांच्या मदतीने शिक्षण पूर्ण केले. दहावी मध्ये ९० % गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला व भरतेश हायस्कूल च्या इतिहासात मराठी माध्यमामध्ये बेळगाव मध्ये पहिला क्रमांक मिळवणारा सौरभ पहिला विद्यार्थी ठरला.

जगप्रसिद्ध कंपनीत मेकॅनिक म्हणून काम करण्याची इच्छा असल्याने मराठा मंडळ पॉलीटेक्नीक कॉलेज मध्ये मेकॅनिकल डिप्लोमा इंजिनियरिंग विभागात प्रवेश घेतला, व ९४% गुण मिळवून कॉलेज मध्ये प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर बी. ई. ची सी.ई.टी. परीक्षा दिली व त्यात सुद्धा १७२ वा क्रमांक मिळवून बेळगावच्या जी. आय. टी. कॉलेज मध्ये बी. ई. मेकॅनिकल विभागात सरकारी कोट्यातून प्रवेश मिळविला. व शेवटच्या सेमिस्टर मध्ये झालेल्या कॅम्पस सिलेक्शन मध्ये त्याची मर्सडिज बेंझ या कंपनीमध्ये निवड झाली. आता पुढील महिन्यात प्रशिक्षणा साठी सौरभ बेगळूरला जाणार असून पुढील महिन्यात जर्मन येथे प्रोजेक्ट साठी पाठवण्यात येणार आहे. लहान भाऊ थोडा शिक्षणात हुशार न्हवता व घरची परिस्थिती पाहता दहावीनंतर त्याचे शिक्षण पूर्ण करणे झेपणारे न्हवते, त्यामुळे त्या धाकट्या भावाने मोठ्या भावाचा शिक्षणाचा भार उचलण्याची तयारी दाखवली व काम करून आर्थिक मदत केली. सध्या तो धाकटा भाऊ उद्यमबाग येथे सी.एन.सी. ऑपरेटर म्हणून काम करतो. सौरभच्या यशात त्याच्या भावाची खूप मोठी साथ त्याला लाभली आहे. सौरभला जर्मन भाषेचेही ज्ञान आहे हे यश मराठी माध्यमाच आहे… बेळगाव लाईव्ह तर्फे सौरभ अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.