Thursday, March 28, 2024

/

‘पर्रिकरांचं’ ते पत्र म्हणजे काँग्रेसला ‘आयत कोलीत’

 belgaum

म्हादाई प्रश्नी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी येडीयुरप्पा यांना लिहिलेलं पत्र भाजपला बुमरँग ठरलंParrikar yeddurappa आहे. कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीने बुधवारी पुकारण्यात आलेला राज्यव्यापी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बी एस येडीयुरप्पा यांना पाठवलेल्या पत्रामुळे म्हादाई नदीचे पाणी वाद भाजपच्या अंगाशी आलाय.

रयत संघटनेने केवळ उत्तर कर्नाटकातील चार जिल्ह्यात हा बंद पुकारला होता मात्र याचे लोण संपूर्ण राज्यभर पसरले होते.बंगळुरू मध्ये देखील याचे तीव्र पडसाद उमटले असून शेतकऱ्यांनी मललेश्वरम येथील राज्य भाजप कार्यालया समोर तीन दिवस अहोरात्र धरणे आंदोलन करून भाजपच्या राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांची झोप उडवली.आता नेमका याच आंदोलनाचा लाभ काँग्रेसने उठवला आहे.बेळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यात हा बंद घोषित करण्यात आला होता मात्र बेळगाव शहरासह जिल्ह्याच्या इतर ठिकाणी देखील याचे पडसाद उमटले होते.बेळगावात सरकार प्रायोजित बंद होता अशीच स्थिती होती

एकूणच म्हादाई प्रश्नी भाजपने घेतलेली भूमिका त्यांना त्यांच्याच अंगलट आली असून म्हादाई ची कर्नाटकात पेटलेली आग बुझवण्याचा प्रयत्न भाजपने कसाबसा चालवला आहे.या प्रश्नी कर्नाटकात सर्व पक्षीयांनी भाजपला टार्गेट केले असून केंद्रीय राज्य मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने पुन्हा भडका उडण्यास मदत झाली.

 belgaum

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लिहिलेलं ते पत्र राष्ट्रीय नेत्यांच्या दबावाखाली लिहिल्याची चर्चा आहे मुळातच गोव्यातल भाजप सरकार महाराष्ट्रवादी गोमंतक आणि अपक्ष आमदारांच्या मदतीने आलं असल्याने 7.56 टी एम सी पाणी देण्याचा त्या पत्रामूळ गोव्यातल सरकार देखील डळमळीत झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.